खाद्यतेल आणखी दहा रुपयांनी स्वस्त

    दिनांक :06-Jul-2022
|
 
Edible oil
 
नवी दिल्ली, 
जागतिक स्तरावर Edible oil तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीच्या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमतीत किमान दहा रुपयांची कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, सरकारने खाद्यतेल उत्पादकांना देशभरातील एकाच ब्रॅण्डचे एमआरपी एकच ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. भारत आपल्या खाद्यतेलाच्या गरजेच्या 60 टक्क्यांहून अधिक आयात करतो. जागतिक बाजारातील संकेतांमुळे किरकोळ किमती गेल्या काही महिन्यात खाली आल्या आहेत. खाद्यतेल निर्मात्यांनी गेल्या महिन्यात Edible oil तेलाच्या दरात प्रती लीटर दहा ते पंधरा रुपयांची कपात केली होती. त्यानुसार एमआरपीही कमी केला होता.