खंबाटकी घाटातील नवीनबोगदा मार्चपर्यंत पूर्ण होणार

    दिनांक :06-Jul-2022
|
नवी दिल्ली,
पुणे-सातारा Nitin Gadkari महामार्गावर खंबाटकी घाटात नव्या सहापदरी बोगद्याचे काम पुढच्या वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी व्यक्त केला आहे. हा बोगदा प्रत्येकी 3 मार्गिकांचा दुहेरी बोगदा असून, त्याची लांबी सहा किलोमीटर आहे. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 926 कोटी रुपये असल्याची माहिती गडकरी Nitin Gadkari यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
 
Nitin Gadkari
 
सातारा-पुणे मार्गावर सध्या असलेल्या तीव्र वळणाचे (एस वळणमार्ग) काम लवकरच पूर्ण होईल, त्यामुळे अपघाताची जोखीम बर्‍याच अंशी कमी होईल, असे गडकरी Nitin Gadkari यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत सुविधांचा कायापालट होत आहे. नव्या भारताला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची गरज आहे, असेही गडकरी म्हणाले. या बोगद्यामुळे संपर्क व्यवस्थेत सुधारणा होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांना त्यांच्या वेळ आणि पैशात बचत करता येणार आहे. पुणे-सातारा आणि सातारा-पुणे हा खंबाटकी घाटमार्गे अनुक्रमे 45 मिनिटे आणि 10-15 मिनिटांचा प्रवास वेळ आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर, या प्रवासाचा सरासरी वेळ कमी होऊन 5-10 मिनिटांवर येईल, असे गडकरी Nitin Gadkari यांनी सांगितले.