वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे

- रोहित, कोहली, बुमराह, हार्दिक, पंतला विश्रांती

    दिनांक :06-Jul-2022
|
नवी दिल्ली, 
पोर्ट ऑफ स्पेन, Shikhar Dhawan त्रिनिदाद येथे 22 जुलैपासून सुरू होणार्‍या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी शिखर धवनची Shikhar Dhawan निवड करण्यात आली. बीसीसीआयने बुधवारी विंडीजविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या व ऋषभ पंतला विश्रांती दिली आहे.
 
Shikhar Dhawan
 
बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने वनडेसाठी सदस्यीय Shikhar Dhawan भारतीय संघाची निवड केली आहे. तिन्ही सामने पोर्ट ऑफ स्पेन येथे होणार आहेत. वन-डे सामन्यांनंतर भारतीय संघ कॅरेबियन व अमेरिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध पाच टी-20 सामने खेळणार आहे, मात्र  मालिकेसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर करण्यात आला नाही.
 
 
भारतीय वन-डे संघ :
शिखर धवन Shikhar Dhawan (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.