पल्लेकेले,
आत्मविश्वासाने भरलेला Indian Women Cricket भारतीय महिला कि‘केट संघ गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्या व अंतिम एकदिवसीय सामन्यात विजय नोंदवून मालिकेत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल. मिताली राजने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर प्रथमच एकदिवसीय क्रिकेट खेळत असलेल्या भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचे पहिले दोन वन-डे सामने जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी मिळविली. भारतीय संघाने याआधी श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली.
दुसर्या एकदिवसीय सामन्यात Indian Women Cricket भारताने लक्ष्यांचा यशस्वी पाठलाग करीत 10 गडी राखून विजय मिळविला. या सामन्यात भारतीय संघाने सर्व विभागात वर्चस्व गाजविले. श्रीलंकेच्या दौर्यात हरमनप्रीत कौर व तिच्या चमूकडून अशाच प्रभावी कामगिरीची अपेक्षा होती. सलामीवीर स्मृती मंधाना व शेफाली वर्मालाही सूर गवसला व त्यांनी नाबाद अर्धशतक झळकावले. आता अखेरच्या वन-डे सामन्यातही ही सलामी जोडी मोठी खेळी करण्यास उत्सुक असेल. कर्णधार हरमनप्रीत या मालिकेत भारताकडून सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणारी खेळाडू आहे.
या एकदिवसीय मालिका वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने देखणी कामगिरी केली आहे. तिने Indian Women Cricket कारकीर्दीतील सर्वोत्तम 28 धावांतील 4 बळींसह दोन सामन्यात एकूण सात बळी टिपले आहेत. अनुभवी झूलन गोस्वामीच्या अनुपस्थितीत अननुभवी रेणुकाची कामगिरी सर्वोत्तम ठरली. भारताने वन-डे मालिका 3-0 ने जिंकल्यास भारतीय संघाचा बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी आत्मविश्वास वाढेल. श्रीलंका पुन्हा एकदा टी-20 मालिकेप्रमाणेच सामंजस्यपूर्ण विजय मिळविण्यासाठी उत्सुक असेल.