काली पोस्टर वाद प्रकरण, खासदार मोईत्रांवर गुन्हा दाखल

    दिनांक :06-Jul-2022
|
भोपाळ,
माहितीपटासंदर्भात MP Mahua Moitra कालीच्या वादग्रस्त पोस्टरविषयी वक्तव्य केल्याने तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्ली, उत्तरप्रदेशसह आता मध्यप्रदेशातही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार महुआ मोईत्रा यांच्या वक्तव्यानंतर खुद्द तृणमूलनेही याबाबत फारसा हस्तक्षेप केला नाही. पक्षाने याविषयी सावध पवित्रा घेतला आहे. हे त्यांचे वैयक्तिक विधान असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. आता मध्यप्रदेशात भोपाळ येथे धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी मोईत्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
 
MP Mahua Moitra
 
खासदार मोईत्राने MP Mahua Moitra हिंदू देवतांचा अपमान कला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. देवतांचा अपमान कोणत्याही स्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ठासून सांगितले आहे. कालीच्या वादग्रस्त पोस्टरसंदर्भात टीव्ही शोमध्ये विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात महुआने देवी काली ही मांसाहारी आहे आणि दारू स्वीकारते, असे म्हटले होते.
शशी थरूरांनी केले समर्थन
सगळीकडे खासदार मोईत्रा MP Mahua Moitra यांच्यावर टीकेची झोड उठली असताना आणि स्वत: त्यांचा पक्षही त्यांच्यासोबत नसताना, काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी मात्र मोईत्रा यांचे समर्थन केले आहे. देशात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा होते. देवीला कोण काय अर्पण करतो, हे भक्तच जाणत असतो. महुआंनी कोणाला अपमानित करण्याच्या हेतूने काही म्हटलेले नाही, असे ट्वीट थरूर यांनी केले आहे.