ट्विटरने मणिमेकलईंचे ट्विट हटवले

    दिनांक :06-Jul-2022
|
नवी दिेल्ली, 
ट्विटरने चित्रपट निर्मात्या Manimekalai's tweet लीना मणिमेकलई यांचे त्यांच्या माहितीपटाविषयीचे ट्विट कायदेशीर मागणीला प्रतिसाद देत काढून टाकले आहे. 2 जुलै रोजी पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये लीना मणिमेकलई यांनी ‘काली’चे कथित वादग्रस्त पोस्टर शेअर केले होते, ज्यात कालिमाता धूम‘पान करताना आणि एलजीबीटीक्यूचे फलक हाती घेऊन असल्याचे चित्रीकरण होते. भारतात या छायाचित्रावरून बराच वादंग झाला असल्याने ट्विटरने मणिमेकलई यांचे ट्विट काढून टाकण्याचे पाऊल उचलले.
 
Manimekalai's tweet
 
या वादग्रस्त पोस्टरवर दिल्ली, उत्तरप्रदेशात पोलिसांत Manimekalai's tweet मणिमेकलई यांच्याविरोधात स्वतंत्र एफआयआर दाखल झाले आहे. सोबतच ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनी कॅनडातील हिंदू देवतांच्या अपमानास्पद चित्रणासंदर्भात कॅनडातील हिंदू समुदायाच्या नेत्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे तेथेही याविषयीचे प्रक्षोभक साहित्य हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.