नवाब मलिक जामिनासाठी पुन्हा कोर्टात

    दिनांक :06-Jul-2022
|
मुंबई,
बेकायदा Nawab Malik सावकारी आणि दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीयाकडून संपत्ती खरेदी करण्याच्या आरोपात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक Nawab Malik यांनी विशेष न्यायालयात जामिनासाठी नव्याने अर्ज दाखल केला आहे.
 
Nawab Malik
 
दाऊदशी संबंध असल्याचे आरोप अर्जात फेटाळण्यात आले आहेत. याबाबत ईडी कोणतेही पुरावे सादर करू शकली नाही, असे मलिक Nawab Malik  यांचे म्हणणे आहे. मलिक यांना एप्रिल महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला. त्यांनी अंतरिम जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने सध्या तपास सुरू असल्याने हस्तक्षेप करणे योग्य नाही, असे सांगत अर्ज फेटाळून लावला होता. उच्च न्यायालयाने मलिकांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. फेब्रुवारीपासून मलिक ईडीच्या कोठडीत आहेत.