ओपेकचे महासचिव बारकिंडो यांचे निधन

    दिनांक :06-Jul-2022
|
अबुजा,
पेट्रोलियम पदार्थ निर्यातक OPEC Secretary General देशांची संघटना अर्थात् ओपेकचे महासचिव मोहम्मद बारकिंडो यांचे निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. नायजेरियन सरकारच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली.
 
OPEC Secretary General
 
मोहम्मद बारकिंडो हे ऑगस्ट 2016 पासून महासचिव पदावर होते. कोरोना महामारी काळातील पेट्रोलियम पदार्थांचे मूल्य स्थिर ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी आपल्या OPEC Secretary General देशातील पेट्रोलियम क्षेत्रातील विविध संस्था आणि संघटनांवर महत्त्वाची जबाबदार्‍या पार पाडल्या. बारकिंडो यांच्या निधनामुळे एनएनपीसी, नायजेरिया देश, ओपेक आणि जागतिक ऊर्जा समूहाचे मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिकि‘या नायजेरियन राष्ट्रीय पेट्रोलियम कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मेले क्यारी यांनी दिली.