सिंधू दुसर्‍या फेरीत, सायनाचे आव्हान संपुष्टात

- मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा

    दिनांक :06-Jul-2022
|
क्वालालंपूर,
येथे आयोजित P. V. Sindhu मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विजय मिळवताना दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूला P. V. Sindhu कडवा संघर्ष करावा लागला, तर फुलराणी सायना नेहवालचे दुसर्‍या फेरीतच आव्हान संपुष्टात आले. सातव्या मानांकित सिंधूने चीनच्या हि बिंग जिओला 21-13, 17-21, 21-15 असे नमवून दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. या विजयाबरोबरच जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने गत महिन्यात इंडोनेशिया ओपन सुपर 1000 मध्ये पहिल्या फेरीत हि बिंग जियोकडून झालेल्या पराभवाचा वचपा घेतला. इंडोनेशियातील स्पर्धेत बिंग जियोने सिंधूला सरळ गेममध्ये पराभूत केले होते.
 
P. V. Sindhu
 
या सामन्यात दुसरीकडे लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायनाला दक्षिण कोरियाच्या किम गा युनकडून 21-16, 17-21, 14-21 असा पराभव पत्करावा लागला. सायना सलग दुसर्‍यांदा P. V. Sindhu पहिल्या फेरीतूनच स्पर्धेच्या बाहेर झाली. जागतिक क्रमवारीत 24 व्या स्थानावर असलेल्या सायनाला गत आठवड्यात मलेशिया ओपन स्पर्धेत पहिल्या फेरीतच पराभव पत्करावा लागला होता.
 
 
पुरुष एकेरीत बी. साई प्रणीत व पारुपल्ली कश्यपने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर शानदार P. V. Sindhu विजय नोंदवित दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. प्रणीतने अर्ध्या तासात केव्हिन कॉर्डनवर 21-8, 21-9 असा सहज विजय नोंदवला, तर कश्यपने जोरदार मुसंडी मारीत स्थानिक खेळाडू टॉमी सुगियार्तोचा 16-21, 21-16, 21-16 असा पराभव केला. प्रणीतचा उपउपांत्यपूर्व फेरीत ली शी फेंगविरुद्ध सामना होईल. समीर वर्माला चीन तैपेईच्या चाऊ तिएन चेनककडून 21-10, 12-21, 14-21 असा पराभव स्वीकारावा लागला. अन्य सामन्यात एच. एस. प्रणॉय तसेच एन. सिक्की रेड्डी व अश्विनी पोनप्पा ही महिला दुहेरी जोडी खेळणार आहे.