पंढरीला जाणार्‍या वारकर्‍यांसाठी टोल माफ - मुख्यमंत्री

    दिनांक :06-Jul-2022
|
मुंबई, 
कोकणातील Pandhari Warkaris गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणार्‍या वारकर्‍यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकर्‍यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत. वारकरी दिंड्यांवर जास्त फोकस करा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिला आहे. यासाठी निधी कमी पडणार नाही, असेही ते म्हणाले.
 
Pandhari Warkaris
 
राज्यात सध्या पावसाने जोर धरला असून, प्रशासनाकडून Pandhari Warkaris नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, दोन वर्षानंतर सुरू झालेल्या वारीसाठीही त्यांनी उपाययोजना केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावर्षीची वारी यशस्वी होणार आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये पोलिसांची महत्वाची भूमिका असते, असे म्हणत त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
 
 
आषाढीच्या निमित्ताने यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीत सहभागी होतील. यावर्षी पंढरपुरात गर्दी वाढेल. त्यामुळे चंद्रभागेत स्नानासाठीची व्यवस्था चोख व्हावी. याठिकाणी चांगली स्वच्छता, त्यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. काठावरील निर्माल्य कलशाची सं‘या वाढवा. ते वेळोवेळी रिकामी होतील, अशी व्यवस्था करा. शौचालयांची स्वच्छता महत्त्वाची आहे. त्यासाठी कर्मचारी चोवीस तास सज्ज राहावे. त्यांना आवश्यक अशी स्वच्छतेचे उपकरणे, सामग्री उपलब्ध करून द्या. कपडे बदलण्यासाठीच्या निवारा व्यवस्थेत वाढ करा, असे निर्देशही त्यांनी दिले.
 
 
मोठा पाऊस झाला तर, पाणी साचू नये, यासाठी व्यवस्था करा. त्यासाठी पंपाचा वापर करा, आरोग्य सुविधा औषधे, फवारणी तसेच ताप, साथीच्या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा आतापासूनच करा. चिखल, पाऊस, पाणी यामुळे गैरसोय होऊ नये, अशी व्यवस्था करा. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर मुखाच्छादन व इतर आवश्यक वस्तूंची व्यवस्था करा. पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांनी समन्वय राखावा. यात्रेचा परिसर खड्डेमुक्त करा. दिंडी मार्गावरील अतिक‘मणे हटवा, हे मार्ग चिखलमुक्त राहतील, यासाठी उपाययोजना करा, अशा सूचनाही शिंदे यांनी केल्या. आज सकाळी मु‘यमंत्र्यांनी टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा करून त्यांना यासंदर्भात सूचना केल्या आहेत.