डुकरांच्या कळपाने तुरीचे पिक उध्वस्त

- शेतकर्‍यावर दुबार पेरणीचे संकट

    दिनांक :06-Jul-2022
|
तभा वृत्तसेवा 
चांदूरबाजार, 
Trumpet Crops खरीपात पेरणी केलेल्या तूर पिकात जंगली डुकरांचे कळप उपद्रव माजवून पिक उध्वस्त करीत आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेतीवरील तूर पिक धोक्यात आले असून पुन्हा शेतकर्‍यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
 
Trumpet Crops
 
Trumpet Crops पेरणी योग्य पाऊस झाल्यावर जंगली डुकराकडून तूर पिकाचे नुकसान होऊ नये, याकरिता शेतकर्‍यांनी तुरीच्या बियाण्याला विशिष्ट वास येणारे औषध लावून पेरणी केली होती. परंतु, बियाण्याला लावलेल्या औषधाचा परिणाम झालेला दिसत नाही. पेरणी केलेल्या तुरीचे पिक कोंब फुटून जमिनीवर आले असताना सूर्य मावळताच जंगली डुकरांचे कळप शेतात येऊन तूर पिकाचे तासे उखरून तूर पिक खाऊन फस्त करीत आहे. परिणामी शेकडो हेक्टर तूर पीक धोक्यात आले आहे. जंगली डुकराच्या उपद्रवातून पिक कसे वाचवावे हे मोठे आव्हान शेतकर्‍यांना पुढे आहे.
 
 
नेहमी कर्जाच्या चक्रव्युवहात असलेल्या शेतकर्‍यांनी खरीपात आगाऊ कर्ज घेऊन मोठ्या आशेने पेरणी केली. पेरणीनंतर जंगली डुकरांच्या कळपाकडून तुर पिक उध्वस्त झाल्याने पुन्हा त्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडला आहे. या संकटातून बळीराजा शेतकर्‍याला बाहेर काढण्यासाठी मायबाप सरकारे मदत करावी, अशी मागणी शेतकर्‍यांची आहे.
 
 
सरकार कडून मदतीची अपेक्षा
माझ्या शेतातील पाच एकरातील तुर पिकासह अनेक शेतकर्‍यांचे पिक जंगली डुकरांच्या कळपाने पूर्णपणे उध्वस्त केले आहे. ही परिस्थिती सर्वच भागात आहे. शासनाने शेतकर्‍यांनी मदत करावी ही अपेक्षा.
- सुनील कोंडे (नुकसानग्रस्त शेतकरी)