मुंबई,
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena party यांना पत्र पाठवून एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे सांगण्याच्या धाडसाची किंमत खासदार भावना गवळी यांना चुकवावी लागली आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोदपदावरून त्यांना हटवण्यात आले. ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भावना गवळी यांना प्रतोदपदावरून हटवल्यानंतर Shiv Sena party शिवसेनेचे 12 खासदार फुटणार असल्याच्या चर्चेने जोर धरला असून, त्यात भावना गवळी यांचे नाव आघाडीवर आहे. शिवसेनेचे राज्यसभेतील सदस्य संजय राऊत यांनी यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहून माहिती दिली. या पत्रात भावना गवळी यांच्या जागी शिवसेनेचे लोकसभेतील मु‘य प्रतोद म्हणून खासदार राजन विचारे यांची तत्काळ प्रभावाने निवड झाल्याचे म्हटले आहे.
शेवटचे वृत्त हाती आले त्यावेळी भावना गवळी यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. मात्र, त्या Shiv Sena party शिवसेनेची साथ सोडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रातील सत्तापालटापूर्वी महाविकास आघाडीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाला टक्कर देण्याची रणनीती आखली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडासाठी भाजपाकडून पुरवण्यात आलेली रसद पाहता शिवसेनेची भूमिका कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, आता राहुल शेवाळे यांनी पक्षाविरोधात जाणारा विचार बोलून दाखवला. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदारही फुटतील, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे. तसे घडल्यास शिवसेनेत उभी फूट पडल्याचा एकनाथ शिंदे गटाच्या दाव्याला आणखी बळकटी मिळेल. त्यामुळे संपूर्ण Shiv Sena party शिवसेना पक्षच आपल्या ताब्यात घेण्याच्या न्यायालयीन लढाईत एकनाथ शिंदे गटाला फायदा मिळू शकतो.