हिंदी वेब मालिकेत झळकणार ‘हास्यजत्रे’चा प्रसाद

    दिनांक :06-Jul-2022
|
मुंबई, 
प्रत्येक वयोगटातील Prasad in web series मराठी प्रेक्षक ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आवर्जून पाहतात. या कार्यक्रमामधील सुप्रसिद्ध कलाकार प्रसाद खांडेकर आता हिंदी वेब मालिकेत दिसणार आहे. प्रसादने त्यांच्या इन्स्टाग्राम खात्याद्वारे एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टद्वारे आपली हिंदी वेब मालिका प्रदर्शित झाली असल्याचे त्याने सांगितले.
 
Prasad in web series
 
प्रसादची Prasad in web series नवीन हिंदी वेब मालिका ‘मिया बिवी और मर्डर’ 1 जुलैपासून एम एक्स प्लेयरवर प्रदर्शित झाली आहे. प्रसादने या वेब मालिकेतील कलाकारंसोबत एक फोटो शेअर केला आहे. ‘मिया बिवी और मर्डर’ वेब मालिकेत राजीव खंडेलवाल, मंजीर फडणीस, रुशद राणा आदी कलाकार मुख्य भूमिकेमत आहेत. ही वेब मालिका वैवाहिक जीवनावर आधारित आहे. प्रसादने या वेब मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.