विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग करणार्‍या सात आमदारांवर कारवाई करा

- पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

    दिनांक :06-Jul-2022
|
मुंबई,
आधी असले Prithviraj Chavan वाटले होते की, आपल्याच तीन आमदारांनी धोका दिला; नंतर असे लक्षात आले की, आमच्या सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. अशा या क्रॉस व्होटिंग करणार्‍या आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मु‘यमंत्री व ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी केली आहे. चव्हाण यांच्या मागणीमुळे आता काँग्रेस पक्षात मोठा भूकंप होतो की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
 
Prithviraj Chavan
 
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या सात आमदारांनी गुप्तपणे क्रॉस व्होटिंग केल्याची माहिती पुढे आली आहे. या सात आमदारांवर पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांची भेट घेऊन केली असल्याची माहिती आहे. यावेळी त्यांनी या घटनेचा सारा तपशील त्यांच्यापुढे मांडल्याचे समजते. विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेस पक्षाचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. चंद्रकांत हंडोरे यांना महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या आमदारांनीही मतदान केले होते. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत वरकरणी काँग्रेसची तीन मते फुटल्याचे दिसत असले तरी, काँग्रेसची प्रत्यक्षात सात मते फुटल्याचे समोर आले होते. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे क्रॉस व्होटिंग करणार्‍या सात आमदारांवर पक्षाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी केली.
 
 
चव्हाण Prithviraj Chavan यांच्या या मागणीनंतर आता एच. के. पाटील दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींकडे काय अहवाल देतात आणि त्यानंतर सोनिया गांधी कशाप्रकारे पावले उचलतात, याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारकडून मांडण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळीही काँग्रेसचे काही आमदार गैरहजर होते. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यावर सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. काँग्रेसचे नेते या ठिकाणी उशिरा पोहोचल्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश मिळाला नव्हता. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करताना महाविकास आघाडीची केवळ 99 मते नोंदवली गेली होती. इतक्या महत्त्वाच्या क्षणीही काँग्रेसचे प्रमुख नेते निष्काळजीपणे वागल्याने अनेकांनी संशय व्यक्त केला होता. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी गैरहजर राहणार्‍या नेत्यांमध्ये अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे, विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे-फडणवीस सरकारला मदत करणार्‍या ‘अदृश्य हातांचे’ आभार मानले होते. पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे मत प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे नोंदवले असल्याचे कळते.