शिवसेनेला पडलेल्या भगदाडामुळे राज ठाकरे सक्रिय

कार्यकर्त्यांच्या भेटीला केली सुरुवात

    दिनांक :06-Jul-2022
|
तभा वृत्तसेवा
मुंबई, 
पक्षप्रमुख Raj Thackeray उद्धव ठाकरे नेत्यांना भेटत नसल्याने पडलेल्या भगदाडामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray सावध झाले आहेत. शस्रक्रियेनंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींना सुरुवात केली आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी आज बुधवारी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सध्याच्या राजकीय घडामोडींवर दोघांत चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते.
 
Raj Thackeray
 
राज्यात शिवसेनेतील मोठी फूट, सत्तांतर अशा अनपेक्षित नाट्यमय घटना घडल्या. मात्र, Raj Thackeray राज ठाकरे त्यांच्यावर शस्रकि‘या झाल्याने या सर्व नाट्यापासून अलिप्त होते. एरवी राज्यातील राजकीय घडामोडींवर राज यांची नेहमी तिखट तर, कधी व्यंग्यात्मक, नर्मविनोदी प्रतिक्रिया हमखास असतेच. मात्र, त्यांनी या संपूर्ण घडामोडींत दोन-चार वेळाच प्रतिकि‘या दिल्या. आता ते पुन्हा एकदा सकि‘य झाले आहेत.
 
 
मनसेचे आमदार प्रमोद उपाख्य राजू पाटील यांनी विधानसभाध्यक्ष निवड असो वा शिंदे-फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक प्रस्ताव असो, पाटील यांनी भाजपाच्या बाजूनेच मतदान केले आहे. आगामी मRaj Thackeray हापालिका निवडणुकांत देखील याचे पडसाद उमटणार आहेत.