पंत सर्वोत्तम पाचव्या स्थानी

- आयसीसी कसोटी क्रमवारी
- कोहली अव्वल दहामधून बाहेर

    दिनांक :06-Jul-2022
|
दुबई,
भारताचा स्टार Rishabh Pant यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या आयसीसी कसोटी क‘मवारीत कारकीर्दीतील सर्वोत्तम पाचवे स्थान प्राप्त केले. सहा वर्षांच्या काळात विराट कोहली प्रथमच अव्वल दहा क्रमांकातून बाहेर पडला. अलिकडेच इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या व अंतिम कसोटी सामन्यात भारताच्या ऋषभ पंतने दोन डावात 146 व 57 धावा केल्या. पंतने गत सहा कसोटी डावांमध्ये दोन शतके व तीन अर्धशतके झळकावलीत, हे येथे उल्लेखनीय.
 
Rishabh Pant
 
तथापि, माजी कर्णधार विराट कोहली फलंदाजी क्रमवारीत चार स्थानांनी घसरून 13 व्या स्थानावर आहे. सहा वर्षांत पहिल्यांदाच कोहली कसोटी क‘मवारीत अव्वल 10 मधून बाहेर पडला आहे. Rishabh Pant कोरोनामुळे अलिकडेच एजबॅस्टन कसोटीला मुकणारा विद्यमान कर्णधार रोहीत शर्मासुद्धा क‘मवारीत एका स्थानाने घसरला.
 
 
इंग्लंडच्या दुसर्‍या डावात 142 धावांची शानदार खेळी करणार्‍या जो रूटने 923 गुणांसह क्रमवारीत आपले अव्वल स्थान बळकट केले. ऑस्टेलियाचा मार्नस लॅबुशेन व स्टीव्ह स्मिथने अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. Rishabh Pant आपल्या नाबाद 114 धावांच्या जोरावर इंग्लंडला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा जॉनी बेअरस्टो याने क्रमवारीत 11 स्थानांची प्रगती करीत 10 वे स्थान मिळविले आहे. बेअरस्टोने सध्याच्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चक्रात सहा शतकांसह 55.36 च्या सरासरीने 1,218 धावा केल्या आहेत.