मुंबई,
Raj Thackeray राज्यात घडलेल्या सत्तासंघर्षामुळे नवे सत्तांतरण झाले आहे. शिंचे गटाच्या आमदार सदा सरवणकर यांनी थेट शिवतीर्थावर जात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे दादर परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले सरवणकर अचानक शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात खळबळ उडाली.
सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्व शिंदे गटातील आमदार हे आपआपल्या मतदारसंघात पोहोचले आहे. आज सकाळी सदा सरवणकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. याबाबत बोलताना सरवणकरांनी राज ठाकरेंच्या भेटीचे कारण स्पष्ट केलं आहे. सेनेला टक्कर देण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत अशी चर्चा रंगली आहे. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नाही. एक हिंदूत्वाची लढाई आहे. अखंड हिंदू एकत्रीकरण, आणि त्यांच्यासाठी झगडनं हेच त्यामागचं उद्देश आहे. आगामी निवडणुकाबाबत विचारले असता, हा निर्णय मुख्यमंत्री घेतील. असे सरवणकर म्हणाले.