शिवसैनिकांच्या अश्रूंची किंमत मोजावी लागेल- उद्धव ठाकरे

    दिनांक :06-Jul-2022
|
तभा वृत्तसेवा
मुंबइ,
एका बाजूला Uddhav Thackeray  गद्दाराच्या डोळ्यातले विकृत हसू आहे. तर दुसर्‍या बाजूला माझ्या शिवसैनिक भगिनींच्या डोळ्यात अश्रू आहेत. यात मधे मी उभा असून, यातून मला मार्ग काढायचा आहे आणि तो काढणारच, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी व्यक्त केला. शिवसैनिकांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत मोजावीच लागणार, असा इशारा देताना, ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच दगा दिल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
 
Uddhav Thackeray
 
मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. आज शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांची त्यांनी बैठक घेतली. आज मला शक्ती मिळाल्याचा अनुभव येत असल्याचे सांगून ठाकरे म्हणाले, आज बहुतेकींच्या डोळ्यात अश्रू आहेत. गद्दारांच्या डोळ्यात विकृत हसू आहे. यात मी उभा आहे. मला यातून मार्ग काढायचा आहे आणि तो मी नक्की काढणार. एकच खंत आहे की, जे 25-30 वर्षे सोबत राहिले, ते कट्टर शत्रू झाले. ज्यांच्यासोबत इतकी वर्षे लढलो, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही सोबत आहेत. ज्यांच्यावर मी पक्षाची धुरा सोपवली होती, त्यांनीच पाठीत वार केला. हे Uddhav Thackeray मला लाजीरवाणे आहे. ज्यांच्या भरोश्यावर चाललो होतो, त्यांनीच दगा दिला.
 
 
काय हिसकावतील हे सांगता येत नाही
हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी अगदी अधिवेशन सुरू असतानाच शिंदे गटाची वाट धरली. बांगर कुठून कुठे गेले, असा प्रश्न पत्रपरिषदेत विचारला असता, Uddhav Thackeray उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरील माईक हातात घेऊन, ते शिवसेनेतच आले, असे उत्तर दिले होते. हाच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी आज माईक हिसकावला, उद्या काय हिसकावतील, हे सांगता येत नाही, असा टोला लगावला.