वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

    दिनांक :06-Jul-2022
|
नवी दिल्ली,
Team India भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वेस्ट इंडिज दौऱ्यावर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. शिखर धवनला वनडे मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघ 22 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत वेस्ट इंडिज दौऱ्यावर असेल. यादरम्यान संघ तीन वनडे आणि पाच टी-२० सामने खेळणार आहे. टीम इंडियाला नवा उपकर्णधारही मिळाला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवींद्र जडेजा वनडे संघाचा उपकर्णधार असेल. मात्र, टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही.
 

annipatah 
 
वेस्ट इंडिज दौऱ्यावर Team India बीसीसीआयने एकदिवसीय मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. हे सर्व खेळाडू 12 जुलै ते 17 जुलै दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियात आहेत. तर ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), आवेश खान यांचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे.
 
 
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ Team India
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
पहिली वनडे: क्वीन्स पार्क ओव्हल, 22 जुलै
दुसरी वनडे: क्वीन्स पार्क ओव्हल, 24 जुलै
तिसरी वनडे: क्वीन्स पार्क ओव्हल, 27 जुलै
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत T20 मालिका वेळापत्रक
पहिला T20: त्रिनिदाद, 29 जुलै
दुसरा T20: सेंट किट्स, 1 ऑगस्ट
तिसरा T20: सेंट किट्स, 2 ऑगस्ट
चौथी T20: लॉडरहिल, फ्लोरिडा, 6 ऑगस्ट
पाचवी T20: लॉडरहिल, फ्लोरिडा, 7 ऑगस्ट