नवी दिल्ली,
कोरोनापासून corona dose बचावासाठी सरकारने प्रतिबंधक लसीची वर्धित मात्रा घेण्याच्या नियमात बदल केला आहे. ही मात्रा आता नऊऐवजी सहा महिन्यांनंतर घेता येणार आहे. ज्यांनी कोरोना लसीची दुसरी मात्रा घेतली असेल, त्यांना वर्धित मात्रा घेता येईल. लसीकरणावरील सरकारची सल्लागार संस्था नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने दुसर्या आणि वर्धित मात्रेतील अंतर कमी करण्याची शिफारस केली होती. याशिवाय त्यांनी 12 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाचीही शिफारस केली आहे.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि प्रशासकीय अधिकार्यांना पाठविलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही बाब नमूद केली आहे. पत्रात म्हटले आहे की, 60 वर्षे आणि त्यावरील नागरिक तसेच आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंट लाईन कामगारांना सहा महिने किंवा corona dose दुसरी मात्रा 26 आठवडे पूर्ण झाल्यानंतर वर्धित मात्रा विनामूल्य दिली जाईल. महाराष्ट्रात आतापयर्र्त 38 लाख 45 हजार लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीची वर्धित मात्रा घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.