आर्थिक क्षेत्राने बाजाराला सावरले

    दिनांक :06-Jul-2022
|
मुंबई, 
युरोपीय financial sector बाजारातील सकारात्मक सुरुवात आणि देशांतर्गत बाजारात गुंतवणूकदारांनी शेअर्स खरेदीचा सपाटा लावल्याने निर्देशांक आणि निफ्टीने उसळी घेतली. त्यातही आर्थिक क्षेत्रातील कंपन्या आणि एफएमजीसीने बाजारांना सावरण्यास मोठा हातभार लावला. मुंबई बाजारातील निर्देशांकात 617 अंकांची वाढ होऊन तो 53,751 वर बंद झाला.
 
financial sector
 
राष्ट्रीय बाजारातील निफ्टीत 179 अंकांची वाढ झाली. तो 15,990 वर financial sector स्थिरावला. ज्या शेअर्सनी आज बाजाराला सावरले, त्यात बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, मारुती सुझुकी इंडिया, टायटन, कोटक महिंद्रा बँक आणि नेस्ले यांचा समावेश होता. मात्र, या सकारात्मक वातावरणातही पॉवर ग्रीड, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो आणि टाटा स्टील यांचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली राहिले.