पाकिस्तानात पुरात 25 मृत्युमुखी

    दिनांक :06-Jul-2022
|
कराची,
पाकिस्तानातील Pakistan Flood बलुचिस्तान प्रांतात आलेल्या पुरासंबंधी विविध दुर्घटनांमध्ये एकूण 25 जणांचा मृत्यू झाला. यात एकाच कुटुंबातील सहा महिलांचा समावेश आहे. या घटना बुधवारी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
Pakistan Flood
 
मागील काही दिवसांपासून Pakistan Flood बलुचिस्तान प्रांतात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे लहान मोठ्या नद्यांना पूर आले असून, काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. क्वेटा जिल्ह्यातील विविध भागातील पुरात वाहून गेल्याने तसेच भूस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये 25 जण मृत्युमुखी पडले. यात वादळी वारे आणि पावसामुळे मातीचे घर कोसळल्याने सहा महिलांचा मृत्यू झाला. याशिवाय अनेक जण जखमी झाले आहेत. बेपत्ता होण्याचे प्रमाणही अधिक असल्याची माहिती प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (पीडीएमए) महासंचालक नासीर अहमद नासेर यांनी दिली.