सदा सरवणकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट

-राजकीय चर्चांना उधाण

    दिनांक :06-Jul-2022
|
मुंबई,
एकनाथ शिंदे गटाचे Raj Thackeray आमदार सदा सरवणकर यांनी आज बुधवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे सदा सरवणकर अचानक शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात खळबळ उडाली होती. सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिंदे गटातील सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात पोहोचले आहेत.
 
Raj Thackeray
 
सदा सरवणकर यांनी आज सकाळी Raj Thackeray राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. या भेटीत सरवणकर यांची मुलगी आणि मुलगा समाधान उपस्थित होते. राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. राज ठाकरे हिंदू पुरस्कर्ते आणि जननायक आहेत तसेच माझे शेजारीही आहेत. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी मला वेळ दिल्याने मी आभारी आहे, असे सरवणकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सांगितले.