पावसाळा सुरू झाल्यावर जि. प.ला आठविली ‘शिकस्त इमारत’

- जि. प.चे व्हीएनआयटीला इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी पत्र

    दिनांक :06-Jul-2022
|
अकोला, 
monsoon starts जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी 29 जून रोजी नागपूरच्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्राद्योगिक संस्थेला इमारतीच्या संरचनात्मक लेखा परीक्षण अर्थात स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भात पत्र दिले आहे. ही इमारत धोकादायक असल्याची आठवण जिल्हा परिषदेला पावसाळा सुरू झाल्यावर झाली. आता संबंधित संस्था यावर कारवाई केव्हा करते हे महत्त्वाचे आहे.
 
broken building
 
monsoon starts जिल्हा परिषदेची सद्यस्थितीत असलेली इमारत 1968 साली बांधून पूर्ण झाली होती. 31 मे रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन झाले होते. 53 वर्षांपूर्वीची इमारत आता जीर्णावस्थेत असून इमारतीत अनेक समस्या आहेत. काही ठिकाणचे छत झुकलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र आहे. तर पावसाळ्यात ओल येऊन अनेक समस्या असल्याच्या तक्रारी कर्मचार्‍यांच्या आहेत. त्यासंदर्भात यापूर्वीच कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषदच्या अधिकार्‍यांना पत्र दिले होते. या इमारतीत 14 पेक्षा अधिक विभागांची 400 कर्मचारी आणि नागरिक, पदाधिकारी, कंत्राटदार यांची वर्दळ असते आणि म्हणूनच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने 1968 साली बांधलेल्या तीन मजली इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रस्ताव दिला आहे.
 
 
ही इमारत वापरण्यास योग्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर ऑडिटनंतर मिळणार असले तरी पावसाळा सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला जाग आली आणि त्यानंतर पत्र देण्यात आले. आता यावर कार्यवाही केव्हा होईल. याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मात्र अद्याप तरी सामान्य दृष्टीस धोकादायक वाटणार्‍या या इमारतीत जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना काम करावे लागणार आहे.