कन्याकुमारी,
सध्या कालिमातेच्या Lord Shiva अवमानजनक पोस्टरवरील वाद पेटला असतानाच, भगवान शंकर सिगारेट पेटवत असलेले कन्याकुमारीतील बॅनर समोर आले आहे.
तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे थिंगल नगरजवळ आरोग्यपुरम् या ठिकाणी हे बॅनर झळकविण्यात आले आहे. येथे काही दिवसांपूर्वीच एक विवाह पार पडला. त्या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी नवरदेव प्रतिशच्या मित्रांनी परिसरात हे बॅनर लावले. त्यांनी दोन बॅनर लावले. एका ठिकाणी नवदाम्पत्याचे छायाचित्र असून, दुसर्या बॅनरवर Lord Shiva भगवान शंकर सिगारेट पेटवत असल्याचे चित्र रंगविण्यात आले. याद्वारे नवरदेवाची थट्टा करण्याचा प्रकार झाला. बॅनरवर नवरदेवासाठी लिहिले आहे की, आपले केस लहानच ठेवा, किती लहान?तर बायको ते पकडू शकणार नाही, असेही त्या बॅनरवर लिहिले.
हिंदू संघटनांच्या नजरेत हे बॅनर येताच समाज माध्यमांवर ते लगेचच व्हायरल झाले.Lord Shiva परिसरातील हिंदू संघटनांनी स्थानिक पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब नवरदेव प्रतिशसह त्याच्या मित्रांना पोलिस ठाण्यात बोलावून समज दिली आणि नंतर सोडून देत बॅनरही हटवण्यात आले.