अरबी समुद्रात जहाज बुडाले, सर्व बचावले

    दिनांक :06-Jul-2022
|
अहमदाबाद,
अरबी समुद्रात Arabian Sea बुडणार्‍या व्यापारी जहाजातील 22 जणांचा जीव वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात बुडणार्‍या एमटी ग्लोबल किंग आय या व्यापारी जहाजातून सर्व 22 क्रू मेंबर्सची सुटका केली आहे.
 
Arabian Sea
 
आयसीजी जहाजे Arabian Sea आणि एएलएच ध्रुव पोरबंदर येथून रवाना करण्यात आले होते, ज्यांच्या मदतीने समुद्रात 93 नॉटिकल मैल अंतरावर बचाव कार्य करण्यात आले, अशी माहिती आयसीजीने दिली आहे. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये 20 भारतीयांसह एक पाकिस्तानी आणि एक श्रीलंकेचा नागरिक आहे. सुटका करण्यात आलेल्या लोकांना आयसीजी जहाजे आणि हेलिकॉप्टरद्वारे पोरबंदर बंदरात आणले जात आहे.