तेलंगणातील भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचा अन्वयार्थ

BJP meet Telangana एका दगडात अनेक पक्षी

    दिनांक :07-Jul-2022
|
दिल्ली वार्तापत्र
- श्यामकांत जहागीरदार
BJP meet Telangana तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली. उत्तर भारत जवळपास पूर्ण पादाक्रांत केल्यानंतर भाजपाने आपले लक्ष आता दक्षिण भारताकडे वळवले; त्याचाच भाग म्हणून भाजपाने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये घेतली. BJP meet Telangana या बैठकीत तसेच नंतर परेड ग्राऊंडमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत भाजपाने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव K.Chandrashekhar Rao तसेच त्यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीवर जोरदार हल्ला चढवला. यामुळे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि भाजपा यांच्यातील तणाव वाढला आहे. BJP meet Telangana
 

dw 
 
BJP meet Telangana पंतप्रधान मोदी आणि भाजपा यांच्यावरची आपली नाराजी दर्शवण्यासाठी राव मोदी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले नाही. विशेष म्हणजे असा प्रकार या राज्यात पहिल्यांदाच नाही तर तिस-यांदा घडला आहे. मुख्यमंत्री राव मोदी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले असते, तर मोदी आणखी मोठे झाले नसते. मात्र, असे करून राव मात्र निश्चितपणे छोटे झाले आहेत. BJP meet Telangana आपल्या राज्यात पंतप्रधान येणार असतील तर संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्याने त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जाणे, हा राजशिष्टाचाराचा भाग आहे. पण गेल्या काही महिन्यात अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांत राजशिष्टाचार धाब्यावर बसवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.
 
 
 
एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून चंद्रशेखर राव आठ वर्षांपासून राज्य सचिवालयात गेले नसल्याचा आरोप गृहमंत्री अमित शाह Home Minister Amit Shah यांनी केला. BJP meet Telangana सचिवालयात पाय ठेवले तर तुमचे सरकार पडेल, असेही या तांत्रिकाने राव यांना सांगितल्याचा दावा शाह यांनी केला आहे. आपल्या निवासस्थानातूनच राव सरकारचे कामकाज चालवत असतात. या दाव्याचे चंद्रशेखर राव वा त्यांच्या पक्षाने आतापर्यंत तरी खंडन केल्याचे वाचण्यात आले नाही. त्यामुळे अमित शाह यांचा हा आरोप खरा असेल, असे मानायला हरकत नाही.
 
BJP meet Telangana या आरोपाला पूरक ठरणारी बाब म्हणजे तेलंगणा सचिवालयाची जुनी इमारत पाडून त्याठिकाणी नवी इमारत बांधण्याचे काम सुरू झाले आहे. या इमारतीच्या बांधकामावर ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सचिवालयाची इमारत एकदमच जीर्ण झाली नव्हती की जी पाडून त्याठिकाणी नवी इमारत बांधावी लागेल. मात्र, जुनी इमारत वास्तुशास्त्राच्या दृष्टीने योग्य नसल्याचे कोणीतरी राव यांना सांगितले. BJP meet Telangana त्यामुळे त्यांनी सचिवालयाची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सचिवालयाची जुनी इमारत पाडताना त्या परिसरात असलेल्या मंदिराचे आणि मशिदीचे नुकसान झाले. मंदिराचे नुकसान झाल्याची तीव्र प्रतिक्रिया हिंदूंमध्ये उमटली. एआय-एमआयएमचे असदुद्दिन ओवैसी यांच्याशी राव यांचे घनिष्ठ संबंंध आहेत. BJP meet Telangana त्यामुळे याच परिसरात मंदिर आणि मशीद बांधून देण्याचे आश्वासन राव यांना द्यावे लागले. हेदेखील बघा...
 
 
 
भाजपा आणि तेलंगणा राष्ट्र समिती यांच्यातील संबंंध तणावपूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रानंतर आता सरकार पाडण्यासाठी तेलंगणाचा नंबर लागू शकतो, असे भाजपाच्या कोणा केंद्रीय मंत्र्याने म्हटले. यामुळे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव भडकले. हिंमत असेल तर आधी माझे सरकार पाडूनच दाखवा; मी त्या क्षणाची वाट पाहात आहे, असे खुले आव्हान त्यांनी देऊन टाकले. BJP meet Telangana माझे सरकार पाडल्यानंतर मी केंद्र सरकार पाडून टाकायला मोकळा होतो, असे प्रतिआव्हान राव यांनी दिले. भाजपा तेलंगणातील राव यांचे सरकार पाडणार की नाही, ते सांगता येणार नाही; मात्र तार्किकदृष्ट्या विचार केला तर भाजपाला राव यांचे सरकार पाडणे फारसे कठीण नाही. मात्र, राव केंद्र सरकार कसे पाडू शकतील, हा मोठा प्रश्न आहे. BJP meet Telangana हेदेखील बघा...
 
 
 
BJP meet Telangana भाजपाने तेलंगणात ‘गुड बाय केसीआर' GoodBye KCR अभियान सुरू केले आहे. चंद्रशेखर राव यांच्या सरकारची उलट गिनतीही भाजपाने सुरू केली आहे. त्यासाठी भाजपा कार्यालयांवर काऊंटडाऊन वॉच लावले आहे. या घड्याळातून राव यांच्या सरकारचे किती दिवस, किती तास आणि किती सेकंद उरले, याचे दर्शन होत आहे. हा एकप्रकारे तेलंगणा राष्ट्र समितीवर मानसिक दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणता येईल. BJP meet Telangana कोणत्याही राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ज्या शहरात असते, ते शहर संबंधित राजकीय पक्षाचा झेंडा, पताका, पोस्टर्स, कटआऊट आणि होर्डिंग्जने सजवण्यात येते. त्यामुळे भाजपाने हैदराबाद शहर सजवले होते. याला प्रत्युत्तर म्हणून तेलंगणा राष्ट्र समितीनेही शहरभर मुख्यमंत्री राव यांच्या छायाचित्रासह होर्डिंग्ज लावले. BJP meet Telangana या होर्डिंग्जमधून पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्यात आले. गुड बाय केसीआर अभियानाला प्रत्युत्तर म्हणून तेलंगणा राष्ट्र समितीने ‘बाय बाय मोदी, अब बस करो, बहुत हो गया मोदी...' असे होर्डिंग्ज लावले. BJP meet Telangana एवढेच नाही तर आपल्या सरकारची उपलब्धी सांगणा-या पान-पानभराच्या जाहिरातीही सर्व दैनिकांना देऊन जागा अडवण्याचा प्रयत्न केला. हेदेखील बघा...
 
 
 
BJP meet Telangana चंद्रशेखर राव यांचे सरकार म्हणजे घराणेशाहीचे निलाजरे प्रदर्शन घडवणारे सरकार आहे. त्यांचे सरकार त्यांचा मुलगा के. टी. रामाराव आणि मुलगी कविता चालवत असल्याचे राज्यात सर्रास बोलले जाते. के. टी. रामाराव मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चाही मध्यंतरी तेलंगणात सुरू झाली होती. BJP meet Telangana रामाराव सध्या चंद्रशेखर राव यांच्या मंत्रिमंडळातही आहेत. राव यांना तसेही काहीच काम नसल्यामुळे त्यांना आता दिल्लीच्या राजकारणात येण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे अधूनमधून ते विरोधी पक्षांच्या ऐक्यांसाठी प्रयत्न करतात, तर कधी विरोधी पक्षांचा राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी पुढाकार घेतात. BJP meet Telangana विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गैरहजर राहणारे राव विरोधी पक्षांचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या स्वागतासाठी मात्र आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांसह विमानतळावर हजर होते. हे देखील वाचा ... अमृता फडणवीस यांचा ठाकरे कुटुंबाला मोलाचा सल्ला
 
चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘कार' आहे. BJP meet Telanganaमात्र, या कारचे स्टिअरिंग एआय-एमआयएमच्या असदुद्दिन औवेसी यांच्या हातात असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. चंद्रशेखर राव यांची ओवैसी यांच्याशी मैत्री आहे. सरकार चालवताना राव हे ओवैसी यांचा सल्ला घेतात, नव्हे त्यांच्या सरकारमध्ये ओवैसी यांचा शब्द अंतिम मानला जातो. BJP meet Telangana ओवैसी यांच्या मुलीच्या लग्नात चंद्रशेखर राव आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह तसेच सरकारसह म्हणजे राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि हैदराबादच्या पोलिस आयुक्तांसह उपस्थित होते. हे देखील वाचा ... स्वत:च्या लहान मुलांचे अनुकरण करत पालकांनी घेतला संन्यास मुस्लिम मतांच्या तुष्टीकरणाची मोहीम राव यांनी ओवैसी यांना हाताशी धरून तेलंगणात सुरू केली आहे. BJP meet Telangana राव यांच्या राजकीय अपरिहार्यतेची जाणीव असल्यामुळे ओवैसी याचा चांगला फायदा घेत आपला राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत.
 
विधानसभेच्या सलग दोन निवडणुका राव यांनी जिंकल्या असल्या, तरी विधानसभेची तिसरी निवडणूक जिंकून हॅटट्रिक  करण्याची संधी त्यांना यावेळी मिळणार नाही, याबाबत कुणाच्याच मनात शंका नाही. BJP meet Telangana राव यांचे भाग्य यावेळी त्यांना साथ देणार नाही, अशी कुजबूज राज्यात सुरू झाली. पंतप्रधान मोदी यांनी भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हैदराबादचा उल्लेख ‘भाग्यनगर' असा करून वेगळे संकेत दिले आहेत. हैदराबाद Hyderabad शहराचे जुने नाव भाग्यनगर तसेच गोवळकोंडा होते, असे म्हणतात. BJP meet Telangana हैदराबाद महानगर पालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी आले असता, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात आमचे सरकार आल्यानंतर हैदराबादचे नामकरण ‘भाग्यनगर' करण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला लक्षणीय यश मिळाले होते. हे देखील वाचा ... उद्धव ठाकरे करणार शिंदे गटाशी हातमिळवणी
 
BJP meet Telangana हैदराबादच्या जुन्या शहरातील चारमिनार परिसरात भाग्यलक्ष्मीचे अतिशय प्राचीन असे मंदिर आहे. यावरून हैदराबाद शहराचे नाव भाग्यनगर असे करण्याची घोषणा केली जाते. विशेष म्हणजे मागील वेळा योगी या मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकले नव्हते. यावेळी मात्र योगींनी भाग्यलक्ष्मीच्या मंदिराला भेट देत दर्शन घेतले. BJP meet Telangana त्यामुळे येत्या काही वर्षांत हैदराबादचे नाव ‘भाग्यनगर' झाले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पंतप्रधान मोदी यांनी तशी सुरुवात करून दिली आहे. त्यामुळे हळूहळू हैदराबादमधील लोकांच्या तोंडीही भाग्यनगर हा शब्द रुळू शकतो. BJP meet Telangana
 
हैदराबाद येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेत भाजपाने एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. BJP meet Telangana तेलंगणातील विधानसभा निवडणुकीला जवळपास दीड वर्षाचा कालावधी आहे. मात्र, भाजपा आतापासूनच या राज्यात कामाला लागला आहे. BJP meet Telangana दक्षिणेतील कर्नाटकमध्ये भाजपाची सत्ता आहेच. आता ओडिशा, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याचे उद्दिष्ट भाजपाने आपल्या समोर ठेवले आहे. BJP meet Telangana पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यामुळे भाजपाला आता अशक्य असे काहीही उरले नाही.
९८८१७१७८१७