लक्ष्मणरेषा ओलांडून...!

Nupur Sharma दुर्दैवी टिपण्या आणि शेरे अभूतपूर्व

    दिनांक :07-Jul-2022
|
अग्रलेख
भाजपाच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा Nupur Sharma यांच्या गाजत असलेल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे न्या. पारडीवाला आणि न्या. सूर्यकांत यांनी न्यायालयात जी टिप्पणी आणि शेरेबाजी केली ती अनावश्यक होती. न्यायाधीशांना असलेली अदृश्य लक्ष्मणरेषा ओलांडून त्यांनी ही टिप्पणी केली आहे. त्याचे परिणामही भयंकर होऊ शकतात आणि सर्वोच्च न्यायालयासारख्या सार्वभौम, सर्वोच्च संस्थेच्या महानतेला हे न शोभणारे आहे. टीव्ही वाहिनीवरील एका चर्चेत वादविवाद करताना नूपुर शर्मा Nupur Sharma यांनी मुस्लिम समाजाच्या भाग घेणा-यास उत्तर देताना आक्षेपार्ह विधान केले, असा आरोप आहे.
 

ns  
 
आक्रस्ताळ्या पंथवेड्या समूहाला यावरून भडकण्याला संधीच मिळाली. त्यांनी नूपुर शर्मा Nupur Sharma यांचा निषेध करायला सुरुवात केली. मग त्यात अनेक भडक विधाने केली जाऊ लागली. हत्या करण्याचे फतवे निघण्यापर्यंत मजल गेली. नूपुर शर्मा यांना भारतीय जनता पक्षाने पक्षातून काढून टाकले. नरेंद्र्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांना कोंडीत पकडण्यासाठी हा विषय उपयोगात आणत काँग्रेससारख्या राजकीय विरोधकांनी हा विषय कसा वाढत जाईल, याचे प्रयत्न केले. त्याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी नूपुर शर्मा Nupur Sharma यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. प्रतिक्रिया म्हणून नूपुर शर्मा Nupur Sharma यांचे समर्थन करणारी भूमिका काही मंडळी समाजमाध्यमावर टाकू लागली. त्या व्हायरल होऊ लागल्या. त्यातून उदयपूर येथे टेलर कन्हय्याची Kanhayalal आणि अमरावती येथे उमेश कोल्हे Umesh Kolhe यांची भीषण हत्या झाली.
 
 
 
नूपुर शर्मा Nupur Sharma यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. देशात वेगवेगळ्या ठिकाणी जे गुन्हे दाखल झाले आहेत ते एकाच ठिकाणी एकत्रित करून त्यावर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी करणारी याचिका होती. अनेकदा अशा प्रकारची मागणी कायद्यातील तरतुदींचा उपयोग करत केली जात असते. अलीकडे अर्णव गोस्वामी यांच्यावर ठाकरे सरकारने अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले तेव्हा अशा याचिकेमुळे ते एकत्रित केले गेले होते. त्यामुळे ही वेगवेगळ्या ठिकाणची सर्व प्रकरणे एकत्रित करायची की नाही इतका निर्णय सर्वोच्च न्यायालयातील या दोन न्यायाधीशांना द्यायचा होता. मात्र, तो देत असताना न्यायमूर्तींनी विनाकारण नूपुर शर्मा Nupur Sharma यांना फटकारले. एक सामाजिक कार्यकर्ता अजय गौतम यांनी न्यायमूर्तींची ही टिप्पणी मागे घ्यावी, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
 
त्यात न्यायमूर्तींनी जी टिप्पणी केली ती सविस्तर दिली आहे. नूपुर शर्मा Nupur Sharma यांच्या प्रकरणात निकाल देताना न्यायमूर्ती म्हणाले की, ‘नूपुर शर्माच Nupur Sharma उदयपूर हत्याकांडाला जबाबदार आहेत. देशात आग भडकण्याला त्याच जबाबदार आहेत. त्यांनी टीव्हीवर येऊन बिनशर्त माफी मागितली पाहिजे. नूपुर शर्मा यांनी एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. दिल्ली पोलिस नूपुर शर्मा यांना अटक करण्यात अयशस्वी ठरले. नूपुर शर्मा Nupur Sharma यांच्या विधानाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. त्यावरचा रागच उदयपूरच्या दुर्दैैवी घटनेस कारणीभूत आहे.' वास्तविक न्यायमूर्तींनी अशा प्रकारे मतप्रदर्शन आणि शेरेबाजी करण्याचे काहीच कारण नव्हते. अशा नाजूक आणि संवेदनशील विषयात कोण काय म्हणतो, याला फार महत्त्व असते. या विधानांचा उपयोग करून हिंसक घटना घडविणा-यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी अशी विधाने करून बळच दिले आहे.
 
Nupur Sharma भारतीय संसदीय लोकशाहीत कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे तीन मूलभूत स्तंभ आहेत. भारतीय घटनाकारांनी या तीनही संस्थांचे बंध असे गुंफले आहेत की, त्यामुळे कोणताही एक स्तंभ आपल्या कामात कमजोर पडू लागला तर दुसरा प्रबळ होऊन समतोल निर्माण करतो. अशा व्यवस्थेमुळे अनेकदा न्यायालयांची सक्रियता गतिमान होते. मात्र, तरीही सक्रिय होताना न्यायालये आपली मर्यादा अपवाद निर्माण झाल्याशिवाय ओलांडत नाहीत. Nupur Sharma या प्रकरणात काहीही गरज नसताना न्यायमूर्तींनी आपली मर्यादा ओलांडून शेरेबाजी केली आहे. या प्रकरणात भारतातील निवृत्त सनदी अधिकारी, निवृत्त न्यायाधीश अशा ११७ लोकांनी एक पत्रक काढून या प्रकरणावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
 
त्यांनी म्हटले आहे की, ‘न्यायसंस्थेच्या इतिहासातील या दुर्दैवी टिपण्या आणि शेरे अभूतपूर्व आहेत आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील न्यायप्रणालीवर असा डाग आहे की, जो काढणे अशक्य आहे. या प्रकारामुळे देशाच्या लोकशाही मूल्यांवर आणि देशाच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे त्यात तत्काळ सुधारणा करणे आवश्यक आहे.' असे वक्तव्य करणा-या न्यायमूर्तींचे रोस्टर निवृत्तीपर्यंत मागे घ्यावे आणि त्यांची या प्रकरणातील विधाने मागे घ्यावीत, असेही या पत्रकात म्हटले आहे. Nupur Sharma  याशिवाय अशाच प्रकारची मागणी करणारी याचिका अजय गौतम यांनी दाखल केली आहे. ११७ मान्यवर नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या शेरेबाजीच्या विरोधात पत्रक काढताच काही बुद्धिजीवी लगेच न्यायमूर्तींच्या बाजूने उभे राहिले आहेत. बार असोशिएशनच्या काही लोकांनी या शेरेबाजीला पाठींबा देणारे पत्र लिहिले आहे. न्यायालयाच्या आवारात कंपूगिरी किती वाढली आहे, ते दर्शविणारा हा प्रकार आहे. Nupur Sharma या कंपूगिरीतूनच न्यायाधीशांवर वैयक्तिक हल्ले करणारे घाणेरडे आरोप करणे इथंपर्यंत मजल जाते. हे पूर्वी सर्वोच्च न्यायालयात घडले आहे.
 
Nupur Sharma वास्तविक गठ्ठा मतांच्या राजकारणाने या देशातील एका अल्पसंख्यक समूहाचे सतत लांगूलचालन केले आहे. हे असले राजकारण देशाच्या मुळाशी कसे येते, हे मुंबईवरील अतिरेकी हल्ला, बाटला हाऊस चकमक अशा अनेक प्रसंगांतून समोर आले आहे. गठ्ठा मतांच्या राजकारणाने या देशातील राज्यघटना बदलून मुस्लिम महिलांचा पोटगीचा अधिकार नाकारला. त्यामुळे सोकावलेल्या या आक्रस्ताळ्या अल्पसंख्यक समाजाकडून सतत क्षुल्लक कारणे घेऊन थयथयाट केला जातो. कधी हिजाबवरून, कधी काहीही संबंध नसलेल्या सीएएवरून तर कधी Nupur Sharma नूपुर शर्मांसारख्या प्रकरणातून हे लोक दंगली घडवतात. दहशत पसरविणारी भयंकर कृत्ये करतात. एरवी कथित पुरोगामी म्हणवणारे अशा प्रकरणात केवळ हिंदुत्ववाद्यांचा विरोध करायचा या कारणाने पंथवेड्या लोकांच्या कालचक्राच्या उलटे चाललेल्या प्रकारांचे समर्थन करतात. सर्वोच्च न्यायालयातील एक कंपू न्यायमूर्तींच्या या अनावश्यक शे-यांचे समर्थन करीत उभा राहिला; त्याचे हेच कारण आहे. Nupur Sharma
 
अशा अनेक प्रकरणांत लक्ष्मणरेषा ओलांडणारे न्यायाधीश वैयक्तिक जीवनात धक्कादायकरीत्या एक बाजू घेऊन उभे असतात. न्यायाधीश म्हणून जी तटस्थता त्यांनी कामकाजात आणि वैयक्तिक आयुष्यात पाळली तरच न्यायसंस्थेवरचा विश्वास पटींनी वाढत जातो. मात्र, काही न्यायाधीश निवृत्त होताच एका जातीपुरत्या संकुचित आंदोलनात उतरतात. दुस-या जातींविरोधात अत्यंत द्वेषपूर्ण आणि त्वेषपूर्ण विधाने करू लागतात. ती पाहिल्यावर यांच्या न्यायदानात यांनी काय न्याय केला, याचे पुनर्विलोकन केले पाहिजे, असे वाटल्याशिवाय राहात नाही. तसे या नूपुर शर्मा Nupur Sharma प्रकरणात न्यायमूर्तींनी लक्ष्मणरेषा ओलांडली आहे. न्यायालयाने वैयक्तिक आवडनिवड, भावना बाजूला ठेवून विचार करायला हवा. आपण जे करीत आहोत त्यामुळे समाजातील सौहार्द वाढणार आहे की संघर्ष आणि ताण वाढणार आहे, याचा विचार त्यांनी करायला हवा होता. नूपुर शर्मा Nupur Sharma यांच्या सुरक्षिततेपासून ते या विषयात समाजमाध्यमात व्यक्त झालेल्या असंख्य लोकांच्या संकटात न्यायमूर्तींच्या या आगंतूक टिप्पणीने वाढच केली आहे. न्या. पारडीवाला आणि न्या. सूर्यकांत यांनी निकाल देताना तोंडी टिप्पणी करून प्रसिद्धी मिळविली; मात्र या प्रकरणात जो लेखी निकाल दिला, त्यात या टिप्पणीचा समावेश करण्याची हिंमत दाखविली नाही.
 
Nupur Sharma म्हणजे केवळ प्रसिद्धी मिळवत हिरोगिरी करायची आहे. मात्र, त्याची कायदेशीर जबाबदारी घेण्याची तयारी नाही. लक्ष्मणरेषा हा शब्द जीवनमूल्य जगणा-या लक्ष्मण, सीता अशा महान व्यक्तिमत्त्वांशी जोडलेला आहे. तो शब्द न्यायसंस्थेने नि:स्पृह रामशास्त्री बाण्याने न्याय करून त्यांच्याशी जोडला जावा, असे करायला हवे होते. मात्र, न्यायसंस्थेत काम करणा-यांनी आपल्या मर्यादा ओलांडल्याने हा शब्द वापरण्याची वेळ आणली आहे. Nupur Sharma ही लक्ष्मणरेषा न्यायसंस्थेतच ओलांडली गेली तर समाजाची शांतता, न्याय आणि स्थैर्य यांचे अपहरण हिंस्त्र रावणांकडून होण्याची शक्यता निर्माण होत असते. अशावेळी समाजातील सज्जनशक्तीने सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. केरळचे राज्यपाल यांनी या प्रकरणात एक मार्मिक प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणतात की, हा देश संविधानाप्रमाणे चालणार की शरीयतप्रमाणे? Nupur Sharma ज्यांना शरीयतप्रमाणे देश चालला पाहिजे असे वाटते त्यांनी शरीयतप्रमाणे चालणारे अनेक देश जगात आहेत तेथे खुशाल जावे आणि तेथील नागरिकत्व पत्करून राहावे. इतकी पारदर्शक सडेतोड भूमिका समाजात ज्या दिवशी स्वीकारली जाईल त्या दिवशी देशाच्या चौफेर प्रगतीला सुरुवात होईल.