नियती आणि वास्तवातून मार्ग काढणारे नामदेवराव घाडगे !

RSSसंघ स्वयंसेवक होणं याचाच अर्थ बौद्ध होणं

    दिनांक :07-Jul-2022
|
ऊन सावली
- गिरीश प्रभुणे
RSS तसं त्यांच्याबरोबर वागताना वयाचं अंतर मिटत असे. तरी प्रथम दर्शनी पाहिल्यावर लगेचच त्यांच्याशी कुणी बोलेल असा त्यांचा चेहरा खासच नव्हता. काहीसा राकट. गडद काळ्या वर्णाकडे वळणारी कांती. RSS ताठ कणा. वय झालं तरी ते कधी वाकले नाहीत. बोलणं अगदी स्पष्ट; समोरच्याच्या हृदयाला भिडणारं. स्पष्टवक्ते असले, तरी उगाचच कुणालाही बोलणार नाहीत. माझ्याशी बोलताना ते काहीसे हळवे बनत. RSS तसं आमच्या वयात चांगलं वीसेक वर्षांचं अंतर असावं. मी त्यांना प्रथम पाहिलं तेच ते प्रौढ असताना; ७० च्या दशकात. ७० मध्येच. ते राहात मजदूर संघाच्या कार्यालयात. भोजनाच्या वेळी येत. RSS अर्धी विजार आणि बाह्यांची बंडी अंगावर असे. बोलत तेव्हा मोठ्यानं बोलायची सवय. बहुधा ऐकायला कमी यायल्यापासून असावं.\
 

us 
 
नामदेव देवबा घाडगे. RSS संघाच्या पद्धतीने नाव सांगत. खांद्यावर एक पंचा-रुमाल असे. बारीक मिशा असत. दाढी अगदी घोटून करीत. अत्यंत शिस्त. टापटिपीत राहणं. सगळं कसं जिथेल्या तिथं. त्यांच्या वागण्यात- बोलण्यात कधीच फरक पडणार नाही. RSS ७० साली जिल्हा प्रचारकांच्या बरोबर- दत्तोपंत म्हस्कर यांच्याबरोबर आम्ही बाबाराव भिडे यांच्याकडे गेलो होतो. आम्ही गंभीर होतो. गुरुजींना भेटायला चाललो होतो. मनात हूरहूर होती. नुकतंच काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. RSS नामदेवराव सांगत होते, ‘‘मी मुंबईत प्रचारक निघालो. एक-दोन वर्षातच पू. बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तनाची घोषणा केली. हिंदू धर्म सोडून बौद्ध विचारांचा स्वीकार करणार.'' RSS सर्वत्र उत्साहाचं वातावरण बनलं. जो तो नागपूरकडे निघाला. माझ्यापुढे प्रश्न उभा राहिला, ‘काय करावं?'
 
 
RSS त्यावेळी श्रीगुरुजींचा प्रवास मुंबईत होता. मी बैठकीत धाडस करून गुरुजींनी विचारलं. RSS ‘‘घरातले-समाजातले सर्वच जण बौद्ध होताहेत. मी काय करू...?'' ‘‘अरे नामदेव, संघ स्वयंसेवक होणं याचाच अर्थ बौद्ध होणं आहे. बघ विचार कर...'' ‘‘मला गुरुजींचं म्हणणं पटलं. मी घरी- समाजात गेलो की, बौद्ध मताप्रमाणे वागायचो. RSS माझ्यासारखे अनेक होते. वामनराव परब यांच्यासारखे खूप जण होते. संघ एक वेगळा प्रयोग होता.'' नामदेवराव सांगत होते, तोपर्यंत आम्ही बाबाराव भिडे यांच्याकडे पोहोचलो.बाबारावांच्या आई नामदेवरावांना एकेरी संबोधत. RSS स्वयंपाकघरात ताटं मांडली गेली. बाबांचं घर एक वेगळाच अनुभव असे. बाहेर अत्यंत कडक कर्मठ राहणारे बाबाराव घरी वेगळेच भासत. पुढे नामदेवरावांकडे समरसता मंचाचे संघटनमंत्री हे काम सोपवलं गेलं. गेली पंचवीसेक वर्षं ते मजदूर संघाचे काम पाहात. RSS मधली १०-१५ वर्षं गेल्यावर मी ‘ग्रामायण' या संस्थेचं एका खेड्यात जाऊन काम करू लागलो होतो. नामदेवराव मला शोधत तिथे आले.
 
दीड-दोनशे एकर जमीन निम्मी डोंगराळ भागाची; मुंबईला गेलेली बौद्ध समाजातील मंडळी परत येऊन शेती करू लागली होती. RSS नामदेवराव प्रत्येक महिला-पुरुषांशी बोलून नोंदी करत होते. चिंचवडेलाही मी भीमनगरमध्ये काम सुरू केलं होतं, पण भांडण मारामा-यांनी, दारू पिणा-यांनी ते बंद पाडलं होतं. RSS एका जळजळीत अनुभवातून गेलो होतो. ‘‘आमचं काय बरं-वाईट व्हायचं ते होऊ द्यात. तुम्ही नका आमच्यात पडू...'' तरीही मी या प्रकल्पात काम करू लागलो होतो. एक-दोन वर्ष झाली. तरीही सर्वजण एक अंतर ठेवून वागत होते. RSS नामदेवराव त्यांच्यात मिसळले. त्यांची मतं जाणून घेतली. मला म्हणाले, ‘‘अरे गिरीश, खूप चांगलं मत झालंय सगळ्याचं. शे-दोनशे स्त्री-पुरुषांना तेही बौद्ध; त्यात काही तमासगीर. यांना त्यांच्या कलानं घेऊन काम करणं अवघडच! पण तू त्यांच्यातच राहतोस हे चांगलं. पण अरे तुझी कामं तुझी तुच करतोस. RSS स्वयंपाक करतोस. जेवतोस. एकटा आंघोळीचे पाणी विहिरीतून तूच काढतोस. तुझे तुच कपडे धुतोस. हळूहळू त्यांना जे करायचंय ते करू दे. त्यांना वाटतं तू ब्राह्मण आहेस म्हणून त्यांच्या हातचं तू काहीच घेत नाहीस. RSS असा समज होणं चांगलं नाही. कपडे तुझे तू धू. पाणी त्यांना आणू दे. शिधा तू दे. स्वयंपाक त्यांना करू दे. मग बघ सारं अंतर मिटून जाईल...! RSS
 
RSSआणि झालं तसंच! सारे अंतर मिटून गेलं. असे नामदेवराव. नामदेवराव प्राचीन काळापासूनचा महार समाजाचा इतिहास संकलित करीत होते. विशेषतः देवगिरीचं-विजयनगरचं साम्राज्य छत्रपती शिवरायांच्या तसेच पेशवाईतलं स्थान. कोरेगाव भीमा स्तंभावरची नावं आणि त्यातले वीर त्यांची गावं ते शोधत होते. निमगाव महाळुंणीला गोखल्यांची गढी आहे, हे समजल्यावर त्यांनी त्यावर संशोधन सुरू केलं. त्यातून एक गोष्ट पुढे आली; ती म्हणजे निमगावात दोन हाडकी हाडवळ आहेत. RSS शंभर-शंभर एकराचे! दोन चावड्या आहेत. याचा त्यांनी खूप पाठपुरावा केला. कोरेगाव भीमा आणि खडकीच्या युद्धाची सर्व माहिती त्यांनी संकलित केली आणि हे युद्ध इंग्रज आणि मराठ्यांमध्ये असलं, तरीही लढणारे सैनिक मराठेच होते दोन्हीकडचे आणि त्यात महार दोन्ही बाजूने लढले. RSS त्यातून या दोन हाडवळ्यांची निर्मिती झाली. ही गोष्ट ८३-८४ ची. या दोन कांबळे मंडळीत इंग्रजांच्या बाजूने लढणारे मुंबई-पुण्याला स्थलांतरित झाले आणि पेशव्यांच्या बरोबर छत्रपतींच्या बरोबरच्या मराठ्याला सैन्यातील महार तमाशा शाहीर काव्य करत हिंडले.
 
RSS नामदेवरावाचं हे संशोधन अफलातून होतं. तर्काला पटणारं होतं. पुढे चार-एक वर्षांनंतर मी समरसता मंच भटके विमुक्त विकास परिषदेचं काम पाहू लागलो. ते त्यांना बिलकूल पसंत नाही पडलं. ‘‘अरे, काही निष्कर्षापर्यंत यायला हवं त्यांना. अजून स्वतःच्या पायावर ते उभे नाहीत. तुझा निर्णय पूर्णतः चूक आहे.'' ते संतापले होते. RSS पुढे माझ्या लक्षात आलं. ‘ग्रामायण'कडून दुसरं कोणीच तिथं गेलं नाही. पुढे हळूहळू जमिनी काही जणांनी काढून घेतल्या. काहींनी विकून टाकल्या. भांडण-मारामा-या सुरू झाल्या. संध्याकाळची बुद्ध वंदना लगेचच बंद झाली. नामदेवराव त्यानंतर तिथे जाऊन राहिले. गेले की दोन-चार दिवस राहायचे. त्यांनी खूप प्रयत्न केला. पण प्रकल्प सावरू शकला नाही. पुढे मीही अधूनमधून जात राहिलो. RSS पण बिघडलेली परिस्थिती काही सुधारता आली नाही. नामदेवरावांचा माझ्यावरचा राग काही गेला नाही.
 
नामदेवराव औंधजवळच्या नांदोशीचे. RSS तिथे काही करावं यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले, पण त्यात यश नाही आलं. महिन्यातून एकदा ते पुण्यात येत. मोतीबागेत जात. जनता बँकेत सुनील भडगेला भेटायला जात. RSS एकदा असे गेले असता जीना उतरत असता पाय घसरला आणि ते पडले. त्यातच जागेवरच त्याचं निधन झाले. सतत दुस-यासाठी झटणारे नामदेवराव यांचं निधन असं झालं. नुकतंच एका वर्षापूर्वी दत्तोपंत ठेंगडी यांच्या हस्ते गावी त्यांचा पंचाहत्तरीनिमित्त सत्कार झाला होता. RSS त्यांच्या गावी त्यांच्या आजोबांची समाधी होती. वडिलांंची पण समाधी होती. वडिलांनी सर्वांना वा-यावर सोडून संन्यास घेतला होता, असं ते म्हणत. RSS परंतु त्यांच्या रुद्राक्षांच्या माळा त्यांच्या सतत जवळ असत. त्यातली एक माळ मी त्यांच्याकडून मागून घेतली होती. संघाचा प्रचारक आयुष्यभराचा म्हणजे संन्याशीच! RSS
 
वडिलांविषयी मी त्यांना म्हणालो होतो,‘‘बौद्धभिख्खू झाले होते की...?'' RSS ‘‘गिरीश, बौद्ध काय आणि हिंदू काय! संसारातून विरक्ती हवी होती त्यांना. वर्ष दोन वर्ष कुठे निघून जायचे आणि मध्येच अवतिर्ण व्हायचे. RSS घरी नाही राहायचे. चावडीवरच त्यांचा मुक्काम असे. घरचं नाही खायचे. गावात मागून आणून खायचे. पूर्वी आम्ही मागूनच खायचो. संन्याशी झाल्यावर ते गावातून मागून आणायचे. स्वत:चं अन्नधान्य सगळ्यांना वाटून टाकत असत.'' RSS नामदेवरावांचा एक आधार वाटे. त्यांना जाऊनही वीसेक वर्ष झालीत. RSS संघप्रचारक कसा असावा, याचं मूर्तिमंत उदाहरण ‘नामदेव देवबा घाडगे...!