जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा मृत्यू

    दिनांक :08-Jul-2022
|
 awta
 
बीजिंग,
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे Shinzo Abe dies यांचा शुक्रवारी गोळी लागल्याने मृत्यू झाला. जपानी माध्यमांनी ही माहिती दिली आहे. नारा प्रीफेक्चरमध्ये संबोधित करत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळी लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. गोळी लागल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात नेले तेव्हा ते कोमात होते, असे सांगण्यात येत आहे. जपानमध्ये बंदूक हिंसाचाराच्या घटना दुर्मिळ आहेत. हा असा देश आहे जिथे हँडगनवर बंदी घालण्यात आली आहे.