या जन्माष्टमीला करा ड्रायफ्रूट खीर...

उपवासातही खाऊ शकता

    दिनांक :18-Aug-2022
|
जन्माष्टमीचा सण (Janmashtami) घराघरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मंदिरे व घराघरांत सजावटीसोबतच रात्री 12 वाजता कृष्णजन्म केला जातो. कृष्ण जन्म केवळ मथुरा आणि वृंदावनमध्येच नव्हे तर देशभर साजरा केला जातो. जर तुम्हीही कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करत असाल आणि पूजा करणार असाल तर नैवेद्यात ठेवा सुक्या मेव्याची खीर आणि मखणा तयार करा.

Janmashtami
 
 
ड्रायफ्रूट खीर बनवण्यासाठी साहित्य-
१. दोन चमचे देशी तूप
२. एक वाटी मकाणे
३. एक लिटर दूध
४. आठ ते दहा बदाम
५. आठ ते दहा काजू
६. अर्धी वाटी साखर
७. एक चमचा वेलची पूड
८. आठ ते दहा बेदाणे.
Janmashtami
ड्रायफ्रूट खीर बनवण्याची पद्धत:
तवा गरम करून त्यात थोडं देशी तूप घाला. या देशी तुपात माखणा तळून घ्या. हवे असल्यास मकाणे छोटे छोटे तुकडे करा. मकाणे चांगले तळले की बाहेर काढून प्लेटमध्ये ठेवा. तसंच कढईत काजू आणि बदाम तळून घ्या. त्यांना एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या.
एका भांड्यात दूध उकळा. एक उकळी आल्यावर गॅसची आच कमी करा. जेणेकरून दूध थोडे घट्ट होईल. नंतर या दुधात चिरलेला मखना टाका. दूध घट्ट होऊन माखणा शिजला की त्यात चिरलेले बदाम आणि काजू घाला. तसेच बेदाण्याचे छोटे तुकडे एकत्र करा. मंद आचेवर ढवळत राहा आणि शेवटी साखर घाला. साखर विरघळली की त्यात वेलची पूड घाला. स्वादिष्ट ड्रायफ्रूट खीर तयार आहे, देवाला अर्पण करा आणि उपवासातही खा.