मुष्टियुद्धात भारताचे चौथे पदक निश्चित

    दिनांक :04-Aug-2022
|
- अमित पांघळ उपांत्य फेरीत

बर्मिंगहॅम, 
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुरुवारी पुरुषांच्या मुष्टियुद्ध (48-51 किलो) फ्लायवेट गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात Amit Panghal अमित पांघळने स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनविरुद्ध विजय मिळविला. या विजयाबरोबरच अमितने मुष्टियुद्धातून भारतासाठी चौथे पदक निश्चित केले. निखत झरीन (50 किग्रॅ), नीतू गंगास (48 किग्रॅ) व मोहम्मद हुसमुद्दीननेही (57 किग्रॅ) आधीच आपापल्या गटातील उपांत्य फेरी गाठून पदके निश्चित केली आहे.
 
 
AMIT-PANGHAL
 
2018 मध्ये गोल्ड कोस्ट राष्ट्रकुलचे रौप्य पदक जिंकणार्‍या अमितने लेननविरुद्ध सर्वानुमते विजय प्राप्त केला. लढत फारशी दर्जेदार नव्हती, पण 26 वर्षीय अमितने त्याच्यापेक्षा लहान असलेल्या लेननवर मात केली. अमितने त्याला आदी खूप बचावात्मक खेळ करण्यास भाग पाडून थकविले. मात्र 20 वर्षीय लेननने अधूनमधून जोरदार प्रतिआक‘मण करून गुण मिळविले. मात्र दुसर्‍या फेरीच्या अखेर Amit Panghal अमित पांघळने आपल्याला दुसरे राष्ट्रकुल पदक मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट केले.