चीनमध्ये 'प्लेस्कूलवर' हल्ला

    दिनांक :04-Aug-2022
|
बीजिंग,
चीनच्या 'Playschool' दक्षिणेकडील जिआंग्शी प्रांतात एका व्यक्तीने बालवाडीवर हल्ला केल्याने तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. एका  निवेदनात पोलिसांनी सांगितले की, संशयित हल्लेखोर 48 वर्षांचा असून त्याचे नाव लिऊ असे आहे.
 
 
dfd
 
याशिवाय प्रांतातील 'Playschool'  अनफू काउंटीमध्ये बुधवारी सकाळी झालेल्या हल्ल्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अलीकडच्या काही दिवसांत समाजाबद्दल द्वेष असलेल्या किंवा मानसिक आजार असलेल्या लोकांकडून झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर चीनने शाळांची सुरक्षा वाढवली आहे. चीन लोकांना वैयक्तिक बंदुका ठेवू देत नाही, म्हणून येथे बहुतेक हल्ले चाकू, घरगुती स्फोटके किंवा पेट्रोल बॉम्बने केले जातात. गेल्या दशकात अशा हल्ल्यांमध्ये जवळपास 100 मुले आणि प्रौढांचा मृत्यू झाला आहे आणि शेकडो जखमी झाले आहेत.