लाहोर,
पाकिस्तानातील (Pakistan old temple) लाहोरमध्ये 1200 जुन्या हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या मंदिरावर बेकायदा कब्जा करण्यात आला होता. मंदिर रिकामे करण्यासाठी लोकांना दीर्घ लढा द्यावा लागला आहे.
पाकिस्तानातील (Pakistan old temple) अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांवर देखरेख करणारी एक फेडरल संस्था, लाहोरच्या प्रसिद्ध अनारकली मार्केटजवळील वाल्मिकी मंदिराचा ताबा, गेल्या महिन्यात एका ख्रिश्चन कुटुंबाकडून घेतला. हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा करणारे ख्रिश्चन कुटुंब गेल्या दोन दशकांपासून केवळ वाल्मिकी जातीतील हिंदूंना मंदिरात पूजा करू देत होते.
ईटीपीबीचे प्रवक्ते अमीर हाश्मी म्हणाले की, 'मास्टर प्लॅन'चा एक भाग म्हणून येत्या काही दिवसांत वाल्मिकी मंदिराचा (Pakistan old temple) जीर्णोद्धार केला जाईल. आज वाल्मिकी मंदिरात १०० हून अधिक हिंदू, काही शीख आणि ख्रिश्चन नेते एकत्र आले. हिंदूंनी त्यांचे धार्मिक विधी पार पाडले आणि लंगरचे आयोजन करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.