ज्येष्ठ अभिनेत्याचे हृदयविकाराने निधन

    दिनांक :04-Aug-2022
|
 CHRTE
 
मुंबई, 
हिंदी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद actor passed बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयाशी संबंधित आजारामुळे त्यांचे निधन झाले आणि 03 ऑगस्ट रोजी संध्याकाळी लखनऊमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एका न्यूज पोर्टलनुसार, अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर तो बरा झाला. काही वेळातच त्याला त्याच्या गावी हलवण्यात आले, तिथे त्याचा मृत्यू झाला. मिथिलेश चतुर्वेदीच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आणि प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केले. फिजा, कोई मिल गया, सत्य, गदर: एक प्रेम कथा, मोहल्ला अस्सी आणि रेडी यांसारख्या चित्रपटांमध्ये तो दिसला होता. याशिवाय त्याने स्कॅम 1992: द हंसल मेहता स्टोरी या वेब सीरिजमध्येही काम केले होते.