भारतीय महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत

    दिनांक :04-Aug-2022
|
बर्मिंगहॅम, 
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय Women's Cricket महिला क्रिकेट संघाने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिवस-रात्र टी-20 सामन्यात बार्बाडोस संघावर 100 धावांनी विजय नोंदविला. या विजयाबरोबरच भारतीय क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने पाकिस्ताननंतर पुन्हा एकदा बार्बाडोसविरुद्ध दणदणीत विजय साकारला.
 
 
JEMIMAH-RODRIGUES
 
भारताने Women's Cricket प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु हे आव्हान बार्बाडोस संघाला पेलवले नाही व ते मर्यादित षटकांत 8 बाद 62 धावांपर्यंतच मजल मारू शकले. भारताकडून शेफाली वर्मा (43), जेमिमाह रॉड्रिग्ज (56) व दीप्ती शर्माने (34) तडफदार फलंदाजी केली, तर वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने 4 बळी, तर मेघना सिंग, स्नेह राणा, राधा यादव व हरमनप्रीत कौरने प्रत्येकी एक बळी टिपला बार्बाडोसकडून कायशाना नाईटने सर्वाधिक 16 धावा केल्या.