अ‍ॅमेझॉनला एक लाख रुपयांचा दंड

    दिनांक :05-Aug-2022
|
- केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची कारवाई
 
नवी दिल्ली, 
ई-वाणिज्य मंचावर विहित केलेल्या अनिवार्य मानकांचे उल्लंघन करीत, घरगुती प्रेशर कुकरच्या विक्रीला परवानगी देऊन ग्राहक हक्कांचे उल्लंघन केले. त्याबद्दल Amazon अ‍ॅमेझॉन या ई-वाणिज्य मंचाविरोधात मुख्य आयुक्त निधी खरे यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
 
 
Amazon
 
या आदेशात म्हटले आहे की, आपल्या मंचावरून विकल्या गेलेल्या 2,265 प्रेशर कुकर खरेदी करणार्‍या ग्राहकांना याबाबत माहिती द्यावी. त्याचबरोबर असे प्रेशर कुकर गोळा करावे आणि त्यांची किंमत ग्राहकांना परत करावी तसेच यासंबंधीचा आपला कार्यवाहीचा अहवाल 45 दिवसांमध्ये सादर करावा. आपल्या मंचावरून अशा प्रकारे प्रेशर कुकरच्या विक्रीला परवानगी दिल्याबद्दल तसेच ‘क्यूसीओ’ नियमांचे आणि ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीने दंड म्हणून एक लाख रुपये Amazon भरावे. 
 
 
प्राधिकरणाने Amazon अ‍ॅमेझॉनसह फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, शॉपक्लुज आणि स्नॅपडील या प्रमुख ई-वाणिज्य मंचांना तसेच या मंचावर नोंदणी केलेल्या विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या होत्या. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण हे देशातील ग्राहक संरक्षण स्थितीवर सतत देखरेख ठेवून आहे. अलिकडेच प्राधिकरणाने सर्व ई-वाणिज्य मंचांना, औषधे आणि सौंदर्य प्रसाधने नियमांच्या अनुसूची ई(1) मध्ये सूचीबद्ध केलेल्या घटकांसह आयुर्वेदिक, सिद्ध आणि युनानी औषधांची विक्री करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, केवळ नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाचे वैध प्रिस्कि‘प्शन वापरकर्त्याने ई-वाणिज्य मंचावर अपलोड केल्यानंतरच, अशा औषधांची विक्री किंवा विक्री सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, हे या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.