सिंधू, लक्ष्य आणि श्रीकांत बॅडमिंटन एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत

    दिनांक :05-Aug-2022
|
बर्मिंगहॅम :
भारतातील अव्वल Badminton बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत यांनी येथे सहज विजय मिळवत राष्ट्रकुल क‘ीडा स्पर्धेच्या एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने 32 च्या फेरीत मालदीवच्या फातिमा नबाहा अब्दुल रज्जाकचा 21-4, 21-11 असा पराभव केला. पुरुष एकेरीत श्रीकांतने युगांडाच्या डॅनियल वानागालियाचा 21-9, 21-9 असा पराभव केला.
 
 
PV-SINDHU- ds
 
जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेत्या 20 वर्षीय लक्ष्य सेनने त्याच्या दुप्पट वयाच्या सेंट हेलेनाच्या व्हर्नन स्मीडचा 21-4, 21-5 असा सरळ गेममध्ये पराभव केला. स्मीड 45 वर्षांचा आहे जागतिक Badminton क‘मवारीत 10 व्या क‘मांकावर असलेल्या लक्ष सेनच्या फटक्यांची गती व वेगवान खेळापुढे त्याचा टिकाव लागू शकला नाही. महिला एकेरीत आकर्षी कश्यपनेही उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. पाकिस्तानच्या माहूर शहजादने स्पर्धेतून माघार घेतल्याने आकर्षीने पुढील फेरीत प्रवेश केला. माहूरने माघार घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा आकर्षी पहिला गेम 22-20 असा जिंकून दुसर्‍या गेममध्ये 8-1 अशी आघाडीवर होती.