खा. जाधव यांनी राष्ट्रपतींची घेतली सदिच्छा भेट

    दिनांक :05-Aug-2022
|
बुलडाणा, 
राष्ट्रपती भवन येथे नवनियुक्त महामहिम राष्ट्रपती (President) श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची खा. प्रतापराव जाधव यांनी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी सोबत राज्यातील शिवसेनेचे खासदार उपस्थित होते. खा. प्रतापराव जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले. भेटी दरम्यान छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षात विशेष कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात येण्याची महामहिम राष्ट्रपतींना विनंती केली आहे. यावेळी शिष्टमंडळात शिवसेना खा. प्रतापराव जाधव, खा. राहुल शेवाळे, खा.श्रीकांत शिंदे, खा.भावना गवळी, खा.कृपाल तुमाणे, खा. श्रीरंग बारणे, खा. संजय मंडलिक, खा.धैर्यशील माने, खा.सदाशिव लोंखडे, खा.हेमंत गोडसे, खा. राजेंद्र गावित उपस्थित होते.

President