लोकसभेत पुन्हा गोंधळ, कामकाज स्थगित

    दिनांक :05-Aug-2022
|
नवी दिल्ली, 
महागाई, बेरोजगारी आणि अन्य मुद्यांवरून आजही Lok Sabha लोकसभेत गोंधळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. लोकसभेच्या कामकाजाला आज प्रारंभ होताच सभापती ओम बिर्ला यांनी 13 व्या लोकसभेचे सदस्य भीमप्रसाद दहल यांच्या निधनाची माहिती दिली. जपानच्या हिरोशिमा आणि नागासकी शहरांवर अमेरिकेने अणू बॉम्ब टाकण्याच्या घटनेचा उल्लेखही बिर्ला यांनी केला. सभागृहाने दहल तसेच अणुबॉम्ब हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहिली.
 
 
Lok Sabha
 
बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच काँग्रेस आणि अन्य विरोधी सदस्यांनी त्यांच्या आसनाजवळ येत घोषणा सुरू केल्या. मात्र, गोंधळातच बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास रेटला. आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया तसेच आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सदस्यांनी आपल्या जागेवर जावे, Lok Sabha सभागृहाचे कामकाज चालू द्यावे, असे आवाहन बिर्ला करीत होते. ही संसद आहे, आपले प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने तुम्हाला निवडून पाठवले आहे. मात्र, तुम्ही सभागृहाच्या कामकाजात अडथळे आणत आहात, प्रश्नोत्तराचा तास व्हावा, असे जनतेला वाटत आहे, पण तुम्हाला मुद्यांवर चर्चा नको आहे, घोषणाबाजी करायची आहे, असे बिर्ला म्हणाले. तुमची वागणूक योग्य नाही, संपूर्ण देश तुम्हाला पाहात आहे. तुम्ही आपल्या जागेवर जा, प्रश्नोत्तराचा तास संपल्यावर तुम्हाला तुमचे मुदे उपस्थित करण्याची परवानगी दिली जाईल, असे बिर्ला म्हणाले. मात्र सभागृहातील गोंधळ थांबत नसल्यामुळे बिर्ला यांनी 25 मिनिटांनी सभागृहाचे कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित केले.
 
राज्यसभेतही गोंधळ
काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज आज सकाळी स्थगित करावे लागले. आज राज्यसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच, काँग्रेस आणि अन्य विरोधी सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनाजवळ येत घोषणाबाजी केली. या गोंधळातच अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले. महागाई, बेरोजगारी आणि चौकशी संस्थांच्या दुरुपयोगाच्या मुद्यावरून विरोधी सदस्य आक‘मक झाले होते. आमचे म्हणणे मांडू द्या, अशी मागणी विरोधी सदस्य करीत होते. यावर त्याची एक प्रकि‘या असते, असे नायडू म्हणाले. तुम्हाला जी घोषणाबाजी करायची, ती सभागृहाच्या बाहेर करा, सभागृहाचे कामकाज चालू द्या, असे नायडू म्हणाले. मात्र विरोधी सदस्य प्रतिसाद देत नसल्यामुळे नायडू यांनी सभागृहाचे कामकाज साडेअकरा वाजेपर्यंत स्थगित केले.