-नॅन्सी पेलोसी यांनी चीनला बजावले
टोकियो,
चीन कोणत्याही अमेरिकन नागरिकाची तैवानला भेट थांबवू शकत नाही, अशा शब्दांत अमेरिकन प्रतिनिधी सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी चीनला सुनावले. Nancy Pelosi नॅन्सी पेलोसी यांनी शुक‘वारी जपानला भेट दिली. आशिया दौर्यातील त्यांचा हा अखेरचा टप्पा आहे. त्यांनी टोकियोमध्ये पत्रकारांना संबोधित केले.
माझा कार्यक्रम ठरवण्याचा अधिकार चीनला नाही. तैवान जागतिक व्यासपीठावर सहभागी होता कामा नये, यासाठी त्याला वेगळे पाडण्याचा चीनचा कट कधीही यशस्वी होणार नाही. चीन आम्हालाच काय अन्य कुणालाही त्या देशात जाण्यापासून रोखू शकत नाही, असे Nancy Pelosi पेलोसी यांनी ठणकावून सांगितले. आशियातील या विस्तारवादी आणि अती महत्त्वाकांक्षी देशाने माझ्या दौर्याच्या आड तैवानला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही तैवानमध्ये शांतता कायम राखण्यास प्रयत्नशील आहोत. अमेरिका-तैवान ही मैत्री मजबूत असून, त्याला प्रतिनिधी सभागृह आणि सिनेटची मान्यता असल्याचेही Nancy Pelosi पेलोसी यांनी स्पष्ट केले.