संपूर्ण घरपट्टी भरलेल्यांना नगरपरिषदेकडून राष्ट्रध्वज मोफत

    दिनांक :05-Aug-2022
|
सातारा, 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ज्या मिळकतधारकांनी दि. 1 एप्रिल 2022 पासून आपली संपूर्ण घरपट्टी भरलेली आहे त्यांना सातारा नगरपरिषदेमार्फत मोफत तिरंगा (National flag) वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सातारा नगरपरिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी दिली.

National flag 
 
ज्या नागरिकांनी दि. 1 एप्रिल 2022 पासून आपली घरपट्टी भरलेली आहे त्यांनी सातारा नगरपरिषद सातारा मुख्य कार्यालय, नगरपरिषद कार्यालय सदर बझार, नगरपरिषद कार्यालय गोडोली, नगरपरिषद कार्यालय शाहुपुरी, नगरपरिषद कार्यालय विलासपूर येथून आपली घरपट्टी भरलेली पावती सोबत घेवून येवून राष्ट्रध्वज घेऊन जावेत व ज्यांना राष्ट्रध्वज विकत घेण्याची इच्छा आहे त्यांनी वरील ठिकाणी रु. 25/- भरुन राष्ट्रध्वज विकत घ्यावेत व येणाऱ्या 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये राष्ट्रध्वज आपल्या घरावर फडकवावेत. तरी नागरिकांनी लवकरात लवकर मिळकतकर भरुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सातारा नगरपरिषदेमार्फत केले जात आहे.