सामाजिक विकासासाठी सहकार्य करणार

    दिनांक :05-Aug-2022
|
-नितीन गडकरी यांना विश्वास
- धोबी समाज महासंघाच्या संमेलनाचे उद्घाटन

नागपूर, 
धोबी समाजातूनही अभियंता, डॉक्टर, वकील, न्यायाधीश, उद्योजक निर्माण व्हावे, यासाठी समाजाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास होणे आवश्यक आहे. समाजाच्या सर्वंकष विकासासाठी व समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण समाजासोबत असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री Nitin Gadkari नितीन गडकरी यांनी आज शुक‘वारी दिले. कविवर्य सुरेश भट सभागृहात धोबी समाज महासंघाच्या संमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. याप्रसंगी आ. मोहन मते, आ. टेकचंद सावरकर, सत्यपाल महाराज, डी. डी. सोनटक्के, न्या. किशोर सोनवणे, राजेंद्र अहेर, माजी आ. दिनेश चौधरी, संजय कनोजिया, सुनील पवार, सचिन कदम आदी उपस्थित होते.
 
 
dhobi-samaj
 
संतांची भूमी असलेल्या विदर्भातील संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज आणि संत गजानन महाराज यांच्या चरणी जनता नतमस्तक होते. गाडगे महाराज समाजसुधारक होते. अस्पृश्यता दूर करून मूल्यांच्या आधारावर समाज चांगला व्हावा, यासाठी त्यांनी जीवनभर कार्य केले. लोकमान्य टिळक म्हणत होते की, माणूस किती जगला, यापेक्षा कसा जगला, हे महत्त्वाचे आहे. गाडगे महाराजांनी आपले सर्व जीवन समाजासाठी समर्पित केले. माणूस हा जातीने नव्हे तर गुणांनी मोठा असतो, या विचारावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि हेच दिशादर्शन या तीनही संतांनी समाजाला दिले, असेही ते म्हणाले. या तीनही संतांनी समाजप्रबोधन केले, समाजाला शिक्षण दिले व समाज संस्कारित केला, असे सांगताना Nitin Gadkari गडकरी म्हणाले, समाजाचा विकास करायचा असेल तर, समाजाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास होणे आवश्यक आहे. सामाजिक जीवनात गाडगे महाराजांच्या विचारांचे अनुकरण करावे लागेल.