विषारी दारूने घेतला सात जणांचा बळी

    दिनांक :05-Aug-2022
|
छपरा, 
बिहारमध्ये बनावटी दारूचे सेवन केल्याने सात जणांचा मृत्यू (Liquor killed) झाला आहे. तर 15 जण आजारी पडले आहेत. प्रशासनानुसार बनावटी दारूचे सेवन करणाऱ्या काही लोकांची दृष्टीही गेली आहे. 
 
Liquor killed
 
जिल्हादंडाधिकाऱ्यांनी सांगितले, 'प्राथमिक दृष्ट्या गावकर्‍यांनी बनावटी मद्य प्राशन केले होते. येथे पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोघांचा पाटणा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मृत्यू झाला, जिथे गंभीर आजारी लोकांना गुरुवारी हलविण्यात आले. यात 10 हून अधिक लोकांची गेली दृष्टी आहे. नोव्हेंबर महिन्यापासून बिहारमध्ये बनावटी दारू प्यायल्याने 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.