अ‍ॅथलेटिक्स : दोन पदके जिंकणारी रूपल ठरली पहिली भारतीय

    दिनांक :05-Aug-2022
|
कैली (कोलंबिया) :
Rupal Chaudhary रूपल चौधरी, उत्तरप्रदेशमधील शेतकर्‍याची मुलगी, जागतिक अंडर-20 अ‍ॅॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे. रूपलने महिलांच्या 400 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले. यापूर्वी तिने चार गुणिले 400 मीटर रिलेमध्ये रौप्य पदक जिंकले होते. रूपल ही उत्तरप्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील शाहपूर जैनपूर गावची रसिवासी आहे. तिचे वडील शेतकरी आहेत.
 
 
Rupa-Choudhari
 
ही 17 वर्षीय खेळाडू Rupal Chaudhary उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तिने तीन दिवसांच्या आत 400 मीटरच्या चार शर्यतीत भाग घेतला. गुरुवारी रात्री झालेल्या महिलांच्या 400 मीटर शर्यतीत रूपलने 51.85 सेकंदांची वेळ नोंदवत ग्रेट ब्रिटनच्या येमी मेरी जॉन (51.50) आणि केनियाच्या दमारिस मुटुंगा (51.71) यांच्या नंतर तिसरे स्थान पटकावले. चार गुणिले 400 मीटर शर्यतीत तिने रौप्य पदक जिंकले होते. भारतीय संघाने 3 मिनिटे 17.76 सेकंदांची वेळ नोंदवून आशियाई ज्युनियर विक‘म केला. ती अमेरिकेच्या खेळाडूनंतर दुसर्‍या क‘मांकावर होती. रूपलने त्याच दिवशी वैयक्तिक 400 मीटर शर्यतीच्या पहिल्या फेरीत भाग घेतला होता आणि त्यानंतर बुधवारी उपांत्य फेरीत आणि गुरुवारी अंतिम फेरीत प्रवेश केला.