महाविकास आघाडीबद्दल शिवसेनेचे मोठे वक्तव्य

    दिनांक :05-Aug-2022
|
गुहागर, 
राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर महाविकास आघाडीबद्दल शिवसेनेची (Shiv Sena) खदखद पहिल्यांदाच बाहेर आली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीबाबत शब्ददेखील बोलत नाहीत, फक्त शिवसेनाच आघाडी बाबत बोलत असल्याची नाराजी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली. त्यावरून . जयंत पाटील स्वबळाची भाषा करत असताना आपण स्वतंत्र का लढू शकत नाही? असा प्रश्नही भास्कर जाधवांनी विचारला आहे.

Aghadi
 
आगामी काळात निवडणुका स्वबळावर लढवल्यास जिंकवून दाखवू, असा विश्वासही Shiv Senaच्या भास्कर जाधवांनी यावेळी व्यक्त केला आहे. जाधवांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीबद्दलची नाराजी चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यात भरीसभर म्हणजे आता उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या भास्कर जाधव यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीवर प्रश्न उपस्थित केला आहे. राज्यातील सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी संजय राऊत यांच्याकडून शिवसेना आमदारांबाबत वापरण्यात येणाऱ्या भाषेबाबत अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. गेलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी आव्हानाची नाही तर आवाहनाची भाषा गरजेची असल्याचं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं होतं.