जि. प., पं. समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

    दिनांक :05-Aug-2022
|
मुंबई, 
राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात केलेल्या दुरूस्तीच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया State Election Commission राज्य निवडणूक आयोगाकडून आज शुुक‘वारी स्थगित करण्यात आली. राज्य शासनाने अधिनियमात केलेल्या बदलासंदर्भातील अध्यादेश 4 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सदस्यपदांच्या जागांच्या संख्येत बदल करण्यात आला असून, सध्याची मतदार विभाग आणि निर्वाचक गणांची रचना तसेच आरक्षणाची प्रक्रियादेखील स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.
 
 
elcto
 
सध्या 25 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात येणार होती. 13 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची केंद्रनिहाय मतदारयादी 8 ऑगस्ट रोजी तर, 12 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची प्रारूप मतदारयादी 10 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. आता ही सर्व प्रक्रिया आहे त्या स्तरावर स्थगित करण्यात आली असून, यथावकाश पुढील आदेश देण्यात येतील, असे रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोलीच्या जिल्हाधिकार्‍यांना State Election Commission राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.