‘‘माफ करा, सुवर्णपदक जिंकू शकले नाही’’

    दिनांक :05-Aug-2022
|
- तुलिका मानला अश्रू अनावर

नवी दिल्ली :
शुक्रवारी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी वाजता राजधानी दिल्लीतील टागोर गार्डनमधील पोलिस क्वार्टरमधील एका घरात फोनची घंटी खणखणते. फोन उचलताच पलीकडून ‘ सॉरी, मी देशासाठी सुवर्णपदक आणू शकलेे नाही’ असा मोठा आवाज येतो. रडक्या सुरातील हा हा आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून 23 वर्षीय Tulika Mann तुलिका मानचा होता. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ज्युडो स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्यानंतर आईशी संवाद साधताना तिने वरील उद्गार काढले.
 
 
Tulika Mann
 
फोनवर बोलत असताना तुलिकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. मात्र, हे अश्रू विजयाचे होते. या अश्रूंमधून तिने यशाशाठी केलेला संघर्ष झळकत होता. तुलिकाच्या डोळ्यातील हे अश्रू लहानपणापासूनच आलेल्या सर्व अडचणींवर तिने विजय मिळविल्याची साक्ष देत होते. मात्र, पूर्ण प्रयत्न करूनही सुवर्णपदक न जिंकल्याने तिने देशवासीयांची माफी मागितली. अर्थात, तिच्या पदकाचा रंग सोनरी नसला तरी तिच्या आईसाठी ते पदक कुठल्याही सुवर्णपदकापेक्षा कमी नव्हते. Tulika Mann तुलिकाची आई अमृता या दिल्ली पोलिसात सब इन्स्पेक्टर म्हणून तैनात आहेत. लहानपणापासून तिच्या आईनेच तुलिकाच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला होता.