शिंदेंना बाजूला केल्यास भाजपाशी युती

    दिनांक :05-Aug-2022
|
- उद्धव ठाकरेंनी दिला होता प्रस्ताव : केसरकर

मुंबई, 
एकनाथ शिंदे यांना बाजूला केल्यास भाजपाशी युती करण्याची आपली तयारी आहे, असा प्रस्ताव शिवसेनेचे पक्षप्रमुख Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांनी दिला होता, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर त्यांनी केला. राणे पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यात मोठा वाटा होता. भाजपाचे व्यासपीठ वापरून राणे पिता-पुत्रांनी आदित्य ठाकरेंची बदनामी केली. सुशांतसिंह प्रकरणात नारायणे राणे यांनी भाजपा कार्यालयात पत्रपरिषदा घेत आदित्य ठाकरेंची बदनामी केली. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आपण संपर्क केला. मी पंतप्रधानांना याबाबत वैयक्तिक संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यावर पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानांच्या मनात बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराण्याबाबत प्रेम आणि आदर असल्याचे दिसून आले. हे प्रकरण पंतप्रधानांपर्यंत पोहोचल्यावर Uddhav Thackeray उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात संवाद सुरू झाला. यानंतर या दोघांची भेटही झाली, असे त्यांनी सांगितले.
 
 
udv
 
पंतप्रधान मोदींसोबत असलेले संबंध जपण्याला Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांची तयारी होती, पण नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद दिल्याने ठाकरे नाराज झाले आणि संबंध बिघडले. भाजपा आणि शिवसेनेत बोलणी सुरू असताना, भाजपाच्या 12 आमदाराचे निलंबन झाले. यामुळे भाजपा आणि शिवसेनेतील संबंध बिघडले. नंतर नारायण राणेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यामुळे अनेक शिवसैनिकही नाराज झाले, असे ते म्हणाले. Uddhav Thackeray उद्धव ठाकरेंची भेट होत नसल्यामुळे आम्ही दुसर्‍या क‘मांकाचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे वारंवार युतीसंदर्भात सांगत होतो. तेही ठाकरेंशी चर्चा करीत होते. परंतु त्यांनी पुढाकार न घेतल्यामुळे अखेर आम्ही शिंदे यांच्या नेतृत्त्वात भाजपाशी युती केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना बाजूला करा, मी युती करायला तयार आहे, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी पाठवला, असे केसरकर यांनी सांगितले.