महागाईविरोधात काँग्रेसचा कंठशोष!

Narendra Modi काँग्रेस नेते रस्त्यांवर उतरले आहेत

    दिनांक :06-Aug-2022
|
अग्रलेख 
Narendra Modi देशभरात सध्या काँग्रेस नेते महागाईविरोधात आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध सुरू असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईविरोधात रस्त्यांवर उतरले आहेत. या आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना अटकही झालेली दिसत आहे. दिल्लीपासून तालुका स्तरापर्यंत या आंदोलनाची तीव्रता बघायला मिळत आहे. Narendra Modi काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम पदार्थांच्या भाववाढीविरोधातही या पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. खरे तर कुठल्या का आंदोलनाच्या निमित्ताने असेना, काँग्रेसच्या नेत्यांना रस्त्यावर उतरण्यास केंद्रातील मोदी सरकारने बाध्य केले आहे. गेली काही वर्षे वगळली तर सातत्याने सत्तेची फळे चाखणा-या काँग्रेस नेत्यांना मुळी आंदोलनांचा विसर पडला होता. Narendra Modi पण काँग्रेसचे आजचे आंदोलन जनतेसाठी नसून सत्ता गेल्याच्या अस्वस्थतेपोटी आहे, हे दिसून येत आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी सुमारे ६० वर्षे या देशावर राज्य केल्याचा इतिहास आहे. Narendra Modi या पक्षाने महागाईविरोधात पूर्वी आंदोलने केली होती आणि गरिबी हटविण्याचा नाराही दिला होता.
 

pic  
 
पण देशातील गरिबी कधीच दूर झाली नाही; गरीब माणूस मात्र महागाईच्या गर्तेत अधिकाधिक रुतत गेला, हे वास्तव नाकारता येत नाही. Narendra Modi काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे की, भाजपाच्या सत्ताकाळात महागाईचा कडेलोट झालेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता मीठ-भाकरीपासूनही दुरावली आहे. लोकांचे जगणे कठीण होऊन गेले आहे. महागाईमुळे गृहिणींचे मासिक बजेट कोलमडले आहे. यामुळे औषध-पाण्याचा खर्च, वीज-पाण्याचे बिल, रस्त्यांसाठीचा कर आणि विविध विकास कामांसाठी लावण्यात आलेला अधिभार भरणेही कठीण होऊन बसले आहे. Narendra Modi काँग्रेस म्हणते त्याप्रमाणे आंदोलन करण्याचा त्यांचा अधिकार असल्याचे कुणीच नाकारत नाहीये. संविधानाच्या चौकटीत राहून सरकारच्या निर्णयांना विरोध करण्याचा अधिकार सर्वच विरोधी पक्षांना आहे. Narendra Modi पण हा पक्ष म्हणतो, त्याप्रमाणे खरोखरीच भाववाढ झालेली आहे का? आणि काही प्रमाणात झालेल्या भाववाढीसाठी या सरकारची अकार्यक्षमता कारणीभूत आहे की या सरकारने आखलेल्या विकास योजनांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे, हे बघावे लागेल.
 
 
 
Narendra Modi २०० वर्षांच्या आक्रमणकारी आणि लूटमारीच्या वसाहतवादाच्या पृष्ठभूमीवर १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. तत्पूर्वी राज्यकर्त्या इंग्रजांनी या देशाची प्रचंड लूट केली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने त्यांच्या परीने देशात सुधारणा करण्याची जबाबदारी आपल्या शिरी घेतली. त्यात त्यांना ब-यापैकी यशही आले. Narendra Modi त्या विकासवाटांमध्ये सत्ताधारी काँग्रेसचे जसे योगदान होते, त्याचप्रमाणे विरोधी पक्षांचाही वाटा होता. देशापुढील अनेक समस्या काँग्रेस पक्षाने मार्गी लावल्या, पण परिस्थितीमुळे म्हणा अथवा जागतिक घटनांच्या परिणामी त्यांच्याच कार्यकाळात देशापुढे समस्यांचा मोठा डोंगरही उभा ठाकला. अगदी २०१४ साली केंद्रात नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थानापन्न होईस्तोवर नक्षलवाद, माओवाद, बॉम्बस्फोटांच्या मालिका, दहशतवादी कारवाया, सीमेपलीकडूनची घुसखोरी, ढासळलेली अंतर्गत सुरक्षा व्यवस्था, चलनवाढ, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, बाहुबलींचे राजकारण, कर्जबुडव्यांचा बोलबाला, राजकारणावरील घराणेशाहीचा पगडा, दलाली, घोटाळे आदी समस्या देशाला भेडसावत होत्या. महागाई तेव्हा नव्हती असे मुळीच म्हणता येणार नाही. आज सत्तेवर आलेल्या भाजपानेही महागाईच्या विरोधात अनेक मोर्चे काढलेले आहेत, आंदोलने केली आहेत, धरणे दिली आहेत आणि सरकारविरोधी कारवायांसाठी भाजपा आणि काँग्रेसविरोधी नेत्यांना तुरुंगातही टाकण्यात आले आहे. Narendra Modi
 
Narendra Modi मोदींनी सत्तेवर येण्यापूर्वी काँग्रेस सरकारला ६० वर्षे दिली; मला केवळ ६० महिने सत्ता द्या, अशी विनंती जनताजनार्दनाला केली होती. लोकांनी मतांचे भरभरून दान त्यांच्या झोळीत टाकले आणि त्यांना सत्तारूढ केले. आज महागाईची तुलना करताना मोदी पूर्वकाळ आणि मोदी उत्तरकाळ याचा विचार केलाच जायला हवा. Narendra Modi मोदींच्या काळात लालफीतशाहीचा शेवटच झाला. मंत्र्यांच्या लाल दिव्यांच्या गाड्या एका सहीच्या फटकाèयाने नाहीशा झाल्या आणि अनेकांची मंत्री होण्याची इच्छाही निमाली. Narendra Modi मोदीनंतरच्या काळात जगात भारताची प्रतिमा प्रचंड उंचावली. प्रत्येक अनिवासी भारतीय याचा अनुभव घेत असून जगात त्याला मिळत असलेल्या मानामुळे त्याची मान अभिमानाने उंचावली आहे. विरोधक महागाईसाठी मोदींच्या विदेश दौèयांवर दोषारोपण करताना दिसतात. Narendra Modi पण मोदींच्या या         दौ-यांमध्ये विविध पाश्चिमात्य देशांशी झालेल्या व्यावसायिक आणि उद्योग जगताशी संबंधित झालेले करार भारताच्या प्रगतीत मैलाचे दगड ठरले, हे कुणीतरी नाकारू शकेल का?
 
Narendra Modi स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या जनगणनेत १९५१ साली आपली लोकसंख्या ३५.९० कोटी होती. त्यात ७५ टक्के लोकसंख्या गरीब होती. आता देशाची लोकसंख्या १३५ कोटी आहे आणि यात गरिबांची संख्या १० टक्के इतकी आहे. Narendra Modi मागील दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या. श्रीलंका, पाकिस्तानची उदाहरणे आपण बघत आहोत. पण हाच काळ मोदी सरकारसाठी संधींचा ठरला. Narendra Modi आपल्या देशालाही कोरोनाचा फटका बसला असताना, याच काळात आपण अनेक क्षेत्रात आपली पावले भक्कमपणे रोवली. केंद्र सरकारकडून ८० कोटी लोकांना मोफत रेशन दिले गेले. हा पैसा सरकारने कुठून आणला? Narendra Modi करदात्यांनी भरलेल्या पैशातूनच सरकारने गरिबांची सेवा केली की नाही? अनेक देशांना आपण औषधांची निःशुल्क निर्यात केली. व्हेंटिलेटर्स पुरविले आणि पीपीई किटमध्ये आपण निर्यातक झालो. रस्ते आणि वीज निर्मितीत अपेक्षेपेक्षा अधिक विकास झालेला दिसत आहे. १९५१ मध्ये भारतात ३.९९ लाख किलोमीटर रस्ते होते. २०१४ मध्ये त्यात ५४ लाख किलोमीटर इतकी वाढ झाली. Narendra Modi मोदी सरकारच्या काळातील रस्ते निर्मितीचा आढावा घ्यायचा झाला तर जवळपास ६५ लाख किलोमीटर रस्त्यांची उभारणी करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांच्या पुढाकारातून अनेक एक्सप्रेस वे निर्माण झाले आणि ते करताना अनेक विक्रमही प्रस्थापित केले गेले.
 
Narendra Modi १९४७ मध्ये भारताची वीज निर्मिती क्षमता केवळ १३६२ मेगावॉट इतकी होती. २०१३-१४ मध्ये वाढून ती १.७५ लाख मेगावॉट म्हणजे १७५ गीगावॉट झाली. देशातील ५.६० गावांमध्ये वीज पोहोचविण्यात जी तत्परता या सरकारने दाखविली ती आजवर कुणालाही दाखवता आलेली नाही. Narendra Modi देशातील गरीब महिलांना उज्ज्वला योजनेंतर्गत सिलेंडर्सचे वाटप केले गेले; तो आकडा विक्रमी होता. त्यामुळे महिलांची कायमस्वरूपी चुलीच्या धुरातून मुक्ती झाली. त्यानंतरच्या काळात कदाचित काही महिलांना दर महिन्याचे सिलेंडर विकत घेणे परवडेनासे झाले असले, तरी ही योजना सरसकट वाईट होती असे कोणीतरी म्हणू शकेल का? Narendra Modi शेतकरी सन्मान योजनेपोटी वर्षाकाठी देशातील कोट्यवधी अल्पभूधारक शेतक-यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा होत आहेत. यातून शेतक-यांची परिस्थिती तर सुधारलीच; शिवाय त्यांच्या गावांची समृद्धीसुद्धा साधली गेली. Narendra Modi देशाला सुजलाम् सुफलाम् करणारा हा प्रयोग शेतक-यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल ठरला.
 
देशातील शिक्षणाच्या स्थितीत झालेला सुधार, वैद्यकीय महाविद्यालयांची वाढलेली संख्या, कृषी उत्पन्नात गाठलेली मजल, फळांच्या उत्पादकतेने गाठलेले नवनवे उच्चांक, शेजारी देशांशी सुधारलेले संबंध, देशी उपग्रहांची वाढलेली संख्या, रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी उचललेली पावले, शाळांच्या संख्येत झालेली वाढ, विमानतळांची संख्या शंभरावर पोहोचणे यातील अनेक बाबी स्वप्नवत वाटणा-या आहेत. Narendra Modi मग या विकास कामांमुळे जर महागाईमध्ये वाढ झाली असेल तर त्याला सरकार कसे जबाबदार ठरणार? एका हाताने द्या आणि दुस-या हाताने घ्या, हा सृष्टीचा नियमच आहे. सरकार एका हाताने भरभरून सुविधा देत असताना, त्या सोयी-सुविधांपोटी लोकांवर महागाईचा भार पडत असेल तर सरकारला दोष कसा देता येणार? Narendra Modi एक मात्र खरे, महागाईविरोधात सुरू असलेल्या काँग्रेसच्या कंठशोषाने फारसे काही साध्य होईल, असे आज तरी वाटत नाही.